एक्स्प्लोर
आमीरची पत्नी किरण रावची पोलिसात धाव
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची पत्नी, निर्माती किरण रावने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलमध्ये धाव घेतली आहे. फेक फेसबुक अकाऊण्ट सुरु करुन सोशल मीडियामध्ये प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सायबर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
फेसबुकवर किरण राव यांच्या नावे खोटं फेसबुक अकाऊण्ट उघडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही, तर संबंधित व्यक्ती किरण यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग करत असल्याचा दावाही राव यांनी केला आहे. पोलिसांनी किरण राव यांची तक्रार दाखल केली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देशात असहिष्णुता वाढत असून भारत असुरक्षित असल्याची भीती किरण यांनी व्यक्त केल्याचं आमीर खानने जाहीर कार्यक्रमात सांगितल्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली होती. अनेकांनी किरण राव यांना देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही त्याचे गंभीर पडसाद उमटले होते.
किरण राव दिग्दर्शित धोबीघाट या चित्रपटात आमीर खानने भूमिका साकारली होती. तर त्यांनी पीपली लाईव्ह, देल्ही बेल्ली यासारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement