एक्स्प्लोर

Kabzaa Trailer : अंगावर शहारे आणणारा किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट; नेटकऱ्यांनी केली 'KGF'सोबत तुलना

Kabzaa : किच्चा सुदीपच्या आगामी 'कब्जा' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Kichcha Sudeep Kabzaa Trailer : उपेंद्र (Upendra) आणि किच्चा सुदीपच्या (Kichcha Sudeep) आगामी 'कब्जा' (Kabzaa) या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'कब्जा'चा ट्रेलर रिलीज! (Kabzaa Trailer Out)

अॅक्शनचा तडका आणि थरार नाट्य असणारा 'कब्जा'चा ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे. या ट्रेलरने चाहत्यांना 'केजीएफ 2'ची (KGF 2) आठवण येत आहे. नेटकऱ्यांनी तर 'कब्जा'ला 'केजीएफ 2'सोबत तुलना करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सिनेनिर्माता आनंद पंडित दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. उपेंद्र आणि किच्चा सुदीपला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'कब्जा' कधी होणार रिलीज? (Kabzaa Release Date) 

'कब्जा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर चंद्रुने सांभाळली आहे. तर आनंद पंडितने (Anand Pandit) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा येत्या 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. 17 मार्च 2023 रोजी विनोदवीर कपिल शर्मा आणि नंदिता दासचा 'ज्विगाटो' हा सिनेमादेखील रिलीज होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर किच्चा सुदीप आणि कपिल शर्मा आमने-सामने येणार आहेत. 

दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपसह श्रिया सरनदेखील 'कब्जा' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 'पठाण'नंतर पुन्हा एकदा हा सिनेमा मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवेल. किच्चा सुदीपचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तसेच पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल. 

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'कब्जा'चा ट्रेलर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील 'कब्जा'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"कब्जा'चा ट्रेलर शेअर करताना खूप आनंद होत आहे. माझा जवळचा मित्र या सिनेमाची निर्मिती करत आहे. तसेच सिनेमातील सर्व कलाकरांना शुभेच्छा". 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 05 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget