Kiccha Sudeep : भाजपप्रवेशाच्या चर्चेदरम्यान किच्ची सुदीपला मिळालं धमकीचं पत्र; एफआयआर दाखल
Kiccha Sudeep : किच्चा सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे.
Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचं धमकीचं पत्र मिळालं आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या मॅनेजरला जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. त्यानंतर बेंगळुरूतील पीएस पुट्टेनाहल्ली येथील पोलिसांनी कलम 120 (ब), 506 आणि आयपीसी कलम 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे.
Karnataka | FIR registered under sections 120B, 506 and 504 IPC at PS Puttenahalli, Bengaluru after Kannada actor Kiccha Sudeep's manager received a letter threatening to release his private video on social media. Police investigation underway
— ANI (@ANI) April 5, 2023
किच्चा सुदीपला धमकीचं पत्र नक्की कोणी दिलं आणि खाजगी व्हिडीओ शेअर करायला कोणी सांगितला हे अद्याप समोर आलेलं नाही. या पत्रात किच्चा सुदीपच्या कुटुंबियांनादेखील अपशब्द वापरण्यात आले आहेत. यापत्रामुळे किच्चा सुदीपसह त्याच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अभिनेत्याची प्रतिमा खराब करण्यासाठी त्याला हे पत्र पाठवण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
कर्नाटकात भाजपचा प्रचार करणार किच्चा सुदीप
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी किच्चा सुदीप भाजपचा प्रचार करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच तो भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार की नाहीदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, आज सुदीपच्या घरी एक बैठक होणार आहे. या बैठकीत तो निवडणूक लढवायची की फक्त प्रचार करायचा याविषयी पुढील नियोजनावर कुटुंबातील सदस्यांचं मत घेणार आहे.
किच्चा सुदीप गेल्या काही दिवसांपूर्वी 31 गायी दत्तक घेतल्यामुळे चर्चेत आला होता. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी त्याने दत्तक घेतल्या आहेत. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली होती. तसेच गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं त्याने कौतुक केलं.
संबंधित बातम्या