(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khatron Ke Khiladi 13 : 'या' दोन स्पर्धकांमध्ये रंगणार अटीतटीचा सामना; ग्रँड फिनाले ते कोण होणार विजेता? जाणून घ्या 'खतरों के खिलाडी 13'बद्दल सर्वकाही...
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'चा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या पर्वाचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी धमाकेदार कामगिरी केली आहे.
'खतरों के खिलाडी 13'चा विजेता कोण होणार? (Khatron Ke Khiladi 13 Winner)
'खतरों के खिलाडी 13' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. 14 स्पर्धकांमधून फक्त दोन स्पर्धक आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.
'खतरों के खिलाडी 13'च्या सेमीफायनलमध्ये एक डबल एविक्शन झालं होतं. त्यात अर्चना गौतम आणि नायरा बॅनर्जीला खेळ सोडावा लागला. त्यानंतर शिव ठाकरे आणि रश्मित कौरदेखील बाहेर पडले. 'टॉप 3' स्पर्धकांमध्ये ऐश्वर्या शर्मा, डीनो जेम्स आणि अरिजीत तनेजा या स्पर्धकांचा समावेश आहे. यातील डिनो जेम्स आणि ऐश्वर्या शर्मा या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम लढत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
सिसायत डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचा विजेता डीनो जेम्स झाला आहे. अद्याप या संदर्भात निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
'खतरों के खिलाडी 13'चा ग्रँड फिनाले कधी पार पडणार? (Khatron Ke Khiladi 13 Grand Finale Update)
'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 14 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडेल. कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात.
'खतरों के खिलाडी 13' या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीमिअर 15 जुलै 2023 रोजी पार पडला. या पर्वात 14 स्पर्धक सहभागी झाले होते. यात रश्मीत कौर, डिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, नायरा एम बनर्जी, साउंडस मौफकीर, शिव ठाकरे, अरिजीत तनेजा, अंजली आनंद, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, अंजुम फकीह, डेजी शाह आणि शीझान खान या स्पर्धकांचा समावेश होता.
संबंधित बातम्या