(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ketaki Chitale : "सामान्य माणसं काय कोणत्या पदालाही सोडणार नाहीत"; ॲट्रॉसिटी कायद्यावर केतकी चितळेची खास पोस्ट
Ketaki Chitale : ॲट्रॉसिटी कायद्यावरुन केतकी चितळेने खास पोस्ट लिहिली आहे.
Ketaki Chitale On Atrocities Act : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. आता अॅट्रॉसिटी कायद्यावर अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
केतकी चितळे पोस्ट काय? (Ketaki Chitale Post)
केतकी चितळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने लिहिलं आहे,"आता एका रुग्णालयातील डीनला, रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करा हे त्याची जात बघून सांगायचे तर आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत.
केतकी चितळेने पुढे लिहिलं आहे,"जय हो Atrocities Act,1989.. आम्ही सामान्य माणसांवर काय..तर आता कुठल्या पदालाही सोडणार नाही". केतकी चितळेच्या या पोस्टवर थोट्या अॅट्रॉसिटीच्या केसमुळे किती तरी लोक भरडले जात आहेत, अत्यंत वाईट वागणूक दिली त्यांना, ॲट्रॉसिटीचा 100% गैरवापर होत आहे, मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
केतकी चितळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant patil) यांनी हे कृत्य करण्यास डीनला भाग पाडलं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यासंदर्भात अभिनेत्री केतकी चितळेने खास पोस्ट शेअर केली आहे.
चौकशीचे आदेश, कारवाई करणार
नांदेडमधील घटनेची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. शासकीय रुग्णालयांमध्ये होत असलेल्या मृत्यू प्रकरणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नांदेडनंतर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16 आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले 9 असे 25 मृत्यू अवघ्या 24 तासांत झाले आहेत.
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमुळे केतकीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच केतकीच्या अंबट गोड या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. केतकी ही ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) या विषयाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. काही नेटकरी केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्टचं कौतुक करतात. तर काही युझर्स तिला ट्रोल करतात.
संबंधित बातम्या