एक्स्प्लोर
सलमानच्या 'ट्यूबलाईट'मधून कतरिना बाहेर
मुंबई : सलमान खान सध्या आपल्या आगामी 'सुलतान' सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहे. मात्र, या सिनेमानंतर सलमान दिग्दर्शक कबीर खानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. 'ट्यूबलाईट'मध्ये कतरिना कैफ सलमानसोबत रोमान्स करताना दिसेल, अशा चर्चा होत्या. मात्र, कतरिना या सिनेमात करताना दिसणार नाही, अशी माहिती मिळते आहे.
'ट्यूबलाईट' सिनेमासाठी आधी कतरिनाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, आता कतरिना सिनेमात नसल्याने दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु झाला आहे. त्यामुळे सलमानसोबत रोमान्स करताना कोण दिसेल, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
कबीर खान यांच्यासोबत 'बजरंगी भाईजना' आणि 'एक था टायगर' या दोन सिनेमांमध्ये सलमान खानने काम केलं आहे. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यामुळे कबीर खान-सलमान खान या जोडगोळीच्या आगामी 'ट्यूबलाईट' सिनेमाची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement