Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : कतरिना आणि विकीची लव्ह-स्टोरी... पहिल्या भेटीचा किस्सा
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. यांचं प्रेम नक्की जुळलं कसं? जाणून घ्या...
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये शाही विवाह सोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लव्ह बर्ड्स कतरिना आणि विकीनं अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या निमित्तानं तुम्हांला एक प्रश्न नक्की पडला असेल की, यांचं प्रेम नक्की जुळलं कसं? तर याबाबत आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत.
मुळात हे सर्व बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शोमध्ये सुरू झालं. कतरिनाने 'उरी' फेम विकीसोबत काम करायला आवडेल असं करण जोहरला सांगितलं. त्यानंतर विकी करणच्या चॅट शोमध्ये आला असता, त्यानं हे विकीला सांगितलं. कतरिनाच्या मते, विकी आणि तिची जोडी मोठ्या पडद्यावर चांगली दिसेल, असं करणनं म्हटलं. हे ऐकताच विकीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून आला. विकी कौशला आनंद गगनात मावेनासा झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
त्यानंतर ही जोडी एका मुलाखतीत एकत्र झळकले. या मुलाखतीत त्यांनी एकमेकांशी त्यांच्या जीवनातील विविध पैलूंबद्दल बोलणं अपेक्षित होतं. या कार्यक्रमाचं स्वरूप असे होते की, यात कोणीही होस्ट नसून एक टेप रेकॉर्डर असेल ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या कॅसेट्स असतील आणि त्यांना टेपमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी. शोमध्ये, विकीने कतरिनाला विचारले की त्यांची पहिली चिट-चॅट रेकॉर्ड होईल अशी कल्पना तिने कधी केली होती का? यावर कतरिनानं हसत उत्तर दिलं की, ''समोरच्या व्यक्तीला ओळखण्यासाठी ही एक चांगली जागा आहे.''
विकी आणि कतरिनाच्या भेटीचे अनेक फोटो यानंतर समोर आले कारण मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून वाचणं शक्य नव्हतं. दोघे विविध पार्ट्यांमध्ये भेटताना दिसले. एका कॉमन फ्रेंडने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत त्यांनी त्यांची पहिली सार्वजनिक हजेरी लावली. ते 'शेरशाह' चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही एकत्र दिसले होते. या व्यतिरिक्त, लॉकडाऊनमध्ये आणि अगदी अलीकडेही विकी अनेकदा त्याच्या प्रेयसीला भेटताना दिसला. त्यांनी मित्रांसोबत बाहेरगावी परदेशी सुट्ट्यांचाही आनंद लुटला.
त्यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा मुंबईतील दिग्दर्शक कबीर खान यांच्या घरी गुपचुप रोका केला. हा समारंभ दिवाळीच्या दिवशी झाला कारण दोन्ही कुटुंबांनी ही तारीख शुभ मानली होती. यावेळी केवळ कुटुंबासह आणि काही मोजके जण उपस्थित होते. कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं लग्न करणार आहेत. सवाई माधोपूर येथे 7 डिसेंबरला संगीत, त्यानंतर 8 डिसेंबरला मेहंदी आणि 9 डिसेंबरला विवाहसोहळा होईल. त्यानंतर 10 डिसेंबरला रिसेप्शन होईल. या जोडीनं लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, राजस्थान प्रशासन यांच्या लग्नाच्या तयारीला लागल्याचं समोर आलं आहे. राजस्थानच्या जिल्हाधिकाऱ्यांचं यासंबंधित बैठकीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. इवेंट मॅनेजमेंट कंपनीलाही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबिंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. कतरिना आणि विकीच्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांनाच परवानगी असेल. लग्नासाठी आमंत्रित पाहुण्यांना सीक्रेट कोड देण्यात येतील.
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जातंय. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. कतरिना आणि विकी शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
- Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : 'मला लग्नाचं आमंत्रण नाही'; विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल कियाराने दिली माहिती
- Sara Ali Khan : लग्नाबाबत सारा अली खाननं उघड केलं गुपित...! सांगितलं कुणासोबत करणार लग्न?
- मिथाली राजची कारकीर्द उलगडणार; Taapsee Pannu च्या 'शाबास मिथू' सिनेमाची तारीख ठरली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha