एक्स्प्लोर
लग्न करुन कुटुंब सुरु करण्याची इच्छा होती, पण... : कतरिना कैफ
'लग्न करण्याची इच्छा तर होती, मात्र माझ्या मनासारखं घडलं नाही. शेवटी तुम्हाला आयुष्याने आखून दिलेल्या रस्त्यावर चालतच राहावं लागतं.' अशा भावना कतरिनाने व्यक्त केल्या होत्या
मुंबई : लग्न करुन कुटुंब सुरु करण्याची इच्छा होती, मात्र आयुष्यात काही वेगळंच घडलं. आता जे होईल, ते होईल, अशा शब्दात अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या भावना व्यक्त केल्या.
'लग्न करण्याची इच्छा तर होती, मात्र माझ्या मनासारखं घडलं नाही. शेवटी तुम्हाला आयुष्याने आखून दिलेल्या रस्त्यावर चालतच राहावं लागतं. मी ती लढाई संपवली आहे. तुम्हाला आशा असलेली प्रत्येक गोष्ट होईलच असं नाही. आता मी देवावर सर्व काही सोडलं आहे. माझ्या नशिबात आणखी चांगल्या गोष्टी असतील, असं मला वाटतं.' अशी आशा कतरिनाने व्यक्त केली.
अभिनेता रणबीर कपूरसोबत काही वर्ष ती रिलेशनशीपमध्ये होती. मात्र 2016 मध्ये दोघांनी एकमेकांपासून फारकत घेतली. रणबीर-कतरिनाचं ब्रेकअप हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता, परंतु दोघांनीही कटुता दूर सारुन मैत्रीचे संबंध कायम ठेवले आहेत.
रणबीर सध्या अभिनेत्री आलिया भटला डेट करत आहे. कतरिना ही त्याची पहिली प्रेयसी नव्हती. तिच्याआधी रणबीर अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र दीपिकाला रणबीरने केलेल्या फसवणुकीची कुणकुण लागली आणि तिनेही त्याला दूर केलं.
35 वर्षांच्या कतरिना कैफने 'बूम' चित्रपटातून 2003 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कतरिना आणि सलमान खान यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही चाहत्यांमध्ये रंगत असत. शाहरुखसोबत तिचा 'झिरो' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement