(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन बांधणार लग्नगाठ? विचारताच म्हणाला, 'आता वेळच...'
Kartik Aaryan and Kriti Sanon wedding rumours : कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर आहेत.
Kartik Aaryan and Kriti Sanon wedding rumours : शेहजादा सिनेमातून कार्तिक आर्यन (Kartik Aaryan ) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) ही जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली. सिनेमातील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरली होती. पण सध्या ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे. कारण कार्तिक आणि क्रिती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत.
दरम्यान या सगळ्यावर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. सध्या मी सिंगलच असून माझ्या कामामुळे या गोष्टींना माझ्यासाठी वेळ नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया कार्तिकने दिली आहे. कार्तिक आणि क्रिती डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे बॉलिवूडचं आणखी एक कपल लग्नाच्या बेडीत अडकणार का? याची उत्सुकता आहे.
कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांची केमिस्ट्री
शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक चित्रपट असला तरी या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला. त्या सिनेमावेळीही त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या.त्यानंतर नुकतच क्रिती सेननच्या एका फॅन पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कार्तिक आणि क्रिती डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं सांगण्यात आलंय.
कार्तिक आर्यनने काय म्हटलं?
माझ्या दिवसभराच्या कामांचा आवाका सध्या खूप वाढला आहे. चंदू चॅम्पियनसाठी माझी सगळ्याच परिने मेहनत सुरु होती. त्यातच 'भुल भुलैया 3'चं देखील शुटींग सुरु होतं. त्यामुळे या सगळ्यात मी पूर्ण व्यस्त होतो. सध्या या गोष्टींसाठी वेळही नाही. कार्तिक (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. कार्तिक आर्यनचा'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता. भूल भुलैया-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
View this post on Instagram