एक्स्प्लोर
बिनधास्त आणि बेधडक चार मुलींची कहाणी, 'वीरे दी वेडिंग'चा ट्रेलर लॉन्च
शशांक घोषने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रेहा कपूर आणि एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 1 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची प्रमुख भूमिका असलेला 'वीरे दी वेडिंग' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तैमूरच्या जन्मानंतर प्रदर्शित होणारा करीना कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे.
सिनेमाचा ट्रेलर 2 मिनिट 49 सेकंदाचा आहे. शहरातील मुलींच्या गोष्टीवर हा सिनेमा बेतला आहे. चित्रपटाच्या नावावरुनच समजतं की, ही कहाणी लग्न आणि त्याच्या तयारीची आहे.
चित्रपटात चार मुलींची गोष्ट आहे. चारही जणींची गोष्ट वेगवेगळी आहे. लग्न, नवरा आणि समाजाबाबत त्यांचा स्वत:चा विचार आहे. नवऱ्यासोबतचं नातं, काम, पुरुष, वैवाहिक आयुष्य, कुटुंब आणि समाज हे चार मुलींच्या दृष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शशांक घोषने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रेहा कपूर आणि एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 1 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement