Taimur Birthday : तू नेहमी ताठ मानेनं जगशील...कारण तू माझा वाघ आहेस; व्हिडीओ शेअर करत करीनाने दिल्या तैमुरला अनोख्या शुभेच्छा
Taimur Birthday : करीनाने तैमूरच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Taimur Birthday : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मोठा मुलगा तैमूर अली खान आज पाच वर्षांचा झाला आहे. करीनाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ती मुलाला प्रत्यक्षरित्या भेटू शकत नसली तरी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
करीनाने तैमूरच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये तैमूर गोंडस दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत करीनाने एक हृदयस्पर्शी संदेशदेखील लिहिला आहे. करीनाने लिहिले आहे,"तुझी पहिली पाऊले, तुझे पहिले पडणे मी खूप अभिमानाने रेकॉर्ड केले आहे. भविष्यात तू मोठी झेप घेशील. तू नेहमी ताठ मानेनं जगशील...कारण तू माझा वाघ आहेस". तैमूरची मोठी बहीण सारा अली खानने तैमूरसोबतच वाढदिवसाचा केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सैफ अली खानदेखील दिसतो आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. करीनाला कोरनाची लागण झाल्याचे कळताच तिने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले होते. तसेच खबरदारी घेत ती कोरोना नियमांचे पालन करत आहे. क्वारंटाईन असल्यामुळे करीनाला सध्या तिच्या मुलाची आणि नवऱ्याची म्हणजेच सैफ अली खानची आठवण येत आहे.
करीनाला आठवण येते मुलाची
करीना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीमुळे तिला तिच्या कुटुंबियांची आठवण येत आहे, याचा अंदाज येत आहे. कोरोना काळातदेखील तिचे पती आणि मुलावरील प्रेम कमी झालेले नाही.
संबंधित बातम्या
Kareena Kapoor : क्वारंटाईन करिना कपूर झाली भावूक, पती आणि मुलासाठी इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत म्हणाली...
Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' नंतर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश अडकणार लग्नबंधनात
हेमा मालिनींचा आम्ही आदर करतो, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रीया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha