एक्स्प्लोर
Advertisement
श्रीदेवीची मुलगी हिंदी 'सैराट'मध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?
मुंबई: मराठी सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाचे हक्क नुकतेच बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने घेतले आहेत. नागराज मंजुळेचा सैराट हिंदीत आणण्याची तयारी करण जोहरने केल्याचं सांगण्यात येत आहे.
जर सैराट हिंदीत आला, तर या सिनेमात 'आर्ची'ची भूमिका कोण साकारणार? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
सैराटमध्ये आर्चीची भूमिका रिंकू राजगुरुने साकारली होती. मात्र हिंदीत आर्चीची भूमिका अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारण्याची शक्यता आहे.
श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनीच जान्हवी ही करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, असं जाहीर केलं आहे. मात्र 'सैराट'मधूनच ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल का, याबाबत मात्र ते सांगू शकले नाहीत.
जान्हवीच्या पदार्पणासाठी 'सैराट'चीच गरज आहे असं नाही, असं बोनी कपूर म्हणाले.
सैराटचे हक्क विकत घेतले
बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनने ‘सैराट’ सिनेमाचे हक्क खरेदी केले आहेत.
नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेल्या ‘सैराट’ सिनेमाने मराठी सिनेक्षेत्रात इतिहास रचला. लोकप्रियता, कौतुक, कमाई या सर्व बाबतीत ‘सैराट’ने सर्व विक्रम मोडीत काढले.
महाराष्ट्रासह देशभरात ‘सैराट’ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मराठीसह हिंदी सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी या सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आमीर, सलमान यांच्यासह सुपरस्टार्सनी प्रेक्षकांना स्वत:हून आवाहन करत सिनेमा पाहण्याची विनंतीही केली होती. एकंदरीतच ‘सैराट’ने सर्वांनाच भुरळ पाडली.
‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधील कलाकार सर्व नवीन असतील. मात्र, कथानकात काहीही बदल केला जाणार नसल्याचीही माहिती मिळते आहे. पुढल्या वर्षी म्हणजेच 2017 साली या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचीही चर्चा आहे. आता ‘परश्या’ आणि ‘आर्ची’च्या भूमिकेत कोण असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
PHOTO - श्रीदेवीची मुलगी हिंदी सैराटमध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?
रोमँटिक सिनेमांचा बादशाह करण जोहर 'सैराट' हिंदीत आणणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement