एक्स्प्लोर
मला शाहरुखशी लग्न करायचंय... : करण जोहर

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर आणि किंग खान शाहरुखचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. या दोघांच्या मैत्री बद्दल नेहमीच चर्चा होते. पण नुकतीच करणने आपल्या या खास मित्राबद्दल अशी काही भावना व्यक्त केलीय, ज्यामुळे सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. करण एका कार्यक्रमामध्ये बोलताना आपल्याला शाहरुखसोबत लग्न करायचंय, अशी भावना व्यक्त केली. वास्तविक, इंडिया टुडे साप्ताहिकाच्या 'इंडिया टुडे कॉनक्लेव-2017' च्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी करणला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. या कार्यक्रमावेळी त्याला शाहरुख खान, ऐश्वर्या राय-बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी कोणासोबत लग्न करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, करणने स्मित हास्य करुन ऐश्वर्या आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना बाजुला सारुन शाहरुखशीच लग्न करेन, असं सांगितलं. याचं कारण स्पष्ट करताना, त्याचं घर प्रचंड आवडत असल्याने, त्यानिमित्त शाहरुखच्या घरात 24 तास राहण्याची संधी मिळेल, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, यानंतर गंभीर झालेल्या करणने लोक काहीही म्हणतात, असं म्हणत विषय टाळला. तसेच सत्यापेक्षा गॉसिपिंग वेगळं असतं, असं मतही यावेळी नोंदवलं.
आणखी वाचा























