एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विकी कौशल औरंगजेब, 'तख्त'मध्ये कोण कोणाच्या भूमिकेत?
गोड गुलाबी प्रेमकथा पडद्यावर दाखवणारा करण यानिमित्ताने पहिल्यांदाच पीरिएड ड्रामाचं दिग्दर्शन करणार आहे.
मुंबई : दिग्दर्शक करण जोहरने 'तख्त' या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या ऐतिहासिक चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर खान, विकी कौशल, आलिया भट, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. गोड गुलाबी प्रेमकथा पडद्यावर दाखवणारा करण यानिमित्ताने पहिल्यांदाच पीरिएड ड्रामाचं दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुघल काळातील घडामोडींवर तख्त चित्रपटाचं कथानक बेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोणता कलाकार कोणती व्यक्तिरेखा साकारणार हे गुलदस्त्यात होतं. मात्र आता हळूहळू याविषयी माहिती बाहेर येत आहे. करण जोहरने याचा उलगडा केलेला नसला, तरी 'बॉलिवूड हंगामा' या वेबसाईटने कोण कोणती भूमिका साकारणार याचा रिपोर्ट दिला आहे.
मुघल साम्राज्यातील सहावा शासक औरंगजेब याची व्यक्तिरेखा हरहुन्नरी अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. विकीची भूमिका असलेले मसान, लव्ह पर स्क्वेअर फूट, राझी, संजू हे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.
रणवीर सिंग या सिनेमात औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोह याची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सिंहासनासाठी औरंगजेबाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली होती.
अभिनेत्री करिना कपूर खान या चित्रपटात जहानारा बेगम साहिब ही भूमिका करणार आहे. शाह जहान आणि मुमताज महल यांची ती सर्वात मोठी कन्या.
अनिल कपूर शाह जहान यांची भूमिका करताना 'तख्त'मध्ये दिसेल. औरंगजेब आणि दारा शुकोह हे शाहजहान यांचे पुत्र.
आलिया भट या सिनेमात रणवीर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. आलिया नादिरा बानू बेगम म्हणजेच दारा शुकोहच्या पत्नीची व्यक्तिरेखा रंगवणार आहे. दारा शुकोह आणि नादिरा बानू बेगम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांना आठ मुलं होती, त्यापैकी चौघं अल्पायुषी ठरले.
भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांची जोडी 'तख्त'मध्ये दिसेल. भूमी 'दिलरस बानू बेगम' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. दिलरस ही औरंगजेबाची पहिली पत्नी आणि पट्टराणी होती.
श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर हिरा बाई या दासीची भूमिका करणार आहे. हिरा बाईच्या सौंदर्याची औरंगजेबाला भुरळ पडली. हिरा बाईला लहान वयातच मृत्यूने गाठलं होतं.
An incredible story embedded in history... An epic battle for the majestic Mughal throne... A story of a family, of ambition, of greed, of betrayal, of love & of succession... TAKHT is about WAR for LOVE....@dharmamovies @apoorvamehta18 pic.twitter.com/BQg6SvdFfb
— Karan Johar (@karanjohar) August 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement