एक्स्प्लोर

Kantara 2 : कांतारा 2 चित्रपटाबाबत मोठी अपडेट; लवकरच रिलीज डेट समोर येणार, 15 ते 20 दिवसांचं शेड्युल शिल्लक

Kantara A Legend Chapter 1 : कांतारा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आता या चित्रपटाशी संबंधित नवीन अपडेट समोर आली आहे.

मुंबई : कांतारा (Kantara) चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत आपली छाप पाडणारा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांची खूप चर्चा झाली. 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपट फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने उत्तम कथा आणि दिग्दर्शनाच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. कांतारा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिट झाल्यानंतरच ऋषभ शेट्टीने कांताराच्या 2 (Kantara 2) घोषणा केली होती. या चित्रपटाचं नाव कांतारा : लेजंड चॅप्टर 1 (Kantara A Legend Chapter 1) असणार आहे. कांताराचा सीक्वेल कथानकानुसार, प्रत्यक्षात या चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी ऋषभ शेट्टी जोरदार तयारी करत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित नवीन अपडेट समोर आली आहे.

कांतारा 2 चित्रपटाबाबत मोठी अपडेट

कांतारा चित्रपटाच्या पुढील भागासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी त्यांच्या टीमसोबत गेल्या एक वर्षापासून वेगाने काम करत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा 2' चित्रपटाचं अर्धे शूटिंग पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. 'कांतारा 2' चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात येत आहे की, चित्रपटाचं आउटडोअर शूटींग पूर्ण झालं आहे, आता फक्त 15 ते 20 दिवसांचं इनडोअर शूटिंग बाकी आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू झालं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

View this post on Instagram
 
A post shared by Hombale Films (@hombalefilms)

कांतारा : लेजंड चॅप्टर 1 कधी रिलीज होणार? (Kantara A Legend Chapter 1 Release Date)

चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पूर्ण झालं आहे. पोस्ट-प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी टीम सध्या मेहनत करत आहे. 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल सध्या खूप चर्चेत आहे. कांतारा चित्रपट कमी बजेटचा चित्रपट होता, पण कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं बजेट 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. 'कांतारा 2' चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

कांतारा चित्रपटाची समीक्षक-प्रेक्षकांकडून प्रशंसा 

ऋषभ शेट्टीने कांतारा चित्रपटात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेत्याच्या भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. या चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर, अच्युथ कुमार आणि प्रमोद शेट्टी यांच्यासह अनेक प्रभावी कलाकार आहेत. ब्लॉकबस्टर ठरण्यासोबतच या चित्रपटाने समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही प्रशंसा मिळाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rajinikanth : जेव्हा थलायला नातवाला सोडायला थेट शाळेत पोहोचतात, सुपरस्टार रजनीकांत यांना वर्गात पाहून चिमुकले थक्क; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
Embed widget