Kanjoos Makhichoos Trailer: 'कंजूस मक्खीचूस' चा ट्रेलर पाहिलात? या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
कुणाल खेमूच्या (Kunal Khemu) कंजूस मक्खीचूस (Kanjoos Makhichoos) या चित्रपटाच्या ट्रेलर नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Kanjoos Makhichoos Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) हा सध्या त्याच्या कंजूस मक्खीचूस (Kanjoos Makhichoos) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कुणाल हा एका कंजूष माणसाच्या भूमिकेत दिसत आहे. कंजूस मक्खीचूस या चित्रपटाच्या ट्रेलर नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
कंजूस मक्खीचूस या चित्रपटात कुणाल खेमू, श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) ,पीयूष मिश्रा, अलका अमीन आणि दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सर्व कलाकारांचा खास अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. कुणाल खेमूने कंजूस मक्खीचूस चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्याने कॅप्शन दिलं, 'तो खूप कंजूष आहे. पण कुटुंबावरचे प्रेम दाखवण्यात कधीच कंजूषपणा करत नाही! कंजूस मक्खीचूसमध्ये जमनाप्रसाद पांडेची अनोखी कहाणी पहा' या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधले.
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट होणार रिलीज
कुणाल खेमू आणि श्वेता त्रिपाठी यांचा कंजूस मक्खीचूस हा चित्रपट झी-5 (Zee5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) 24 मार्च रोजी रिलीज होणार आहे. कंजूस मक्खीचूस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक आता या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
कुणाल खेमूनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या कंजूस मक्खीचूस या चित्रपटाच्या ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ट्रेलरमध्ये राजू श्रीवास्तव यांना पाहून छान वाटलं' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत. '
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
कुणाल खेमूचे चित्रपट
1993 मध्ये रिलीज झालेल्या 'सर' या चित्रपटात कुणालनं बालकलाकार म्हणून काम केलं. त्याने गोलमान अगेन, गोलमाल-3, लूट केस, कलंक आणि मलंग या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यानं अभय या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: