एक्स्प्लोर

Shubhneet Singh : भर कॉन्सर्टमध्ये 'ती' हुडी दाखवणं पडलं महागात, शुभनीत सिंह पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, कंगना म्हणाली, "लाज वाटली पाहिजे..."

Shubhneet Singh : शुभनीत हा एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॉन्सर्टमध्ये शुभनीत हा एक हुडी प्रेक्षकांना दाखवतो.

Shubhneet Singh : गायक आणि रॅपर  शुभनीत सिंह (Shubhneet Singh) हा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी शुभनीत सिंह हा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत होता. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं खालिस्तानींना पाठिंबा दिला, असा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला. पण आता शुभनीत हा एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॉन्सर्टमध्ये शुभनीत हा एक हुडी प्रेक्षकांना दाखवतो. शुभनीतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक अनेक लोक शुभनीतवर टीका करत आहेत.

'ती' हुडी दाखवणं पडलं महागात (Shubhneet Singh Viral Video)

शुभनीत सिंहच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शुभनीत हा प्रेक्षकांना एक हुडी दाखवत आहे. या हुडीवर छापलेल्या चित्रात सतवंत सिंह आणि बेअंत सिंह हे  इंदिरा गांधींची हत्या करताना दिसत आहेत, असं म्हटलं जात आहे.   शुभनीत सिंहनं ही हुडी कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना दाखल्यामुळे आता अनेक जण शुभनीतला ट्रोल करत आहेत.  

कंगना शुभनीत सिंहवर भडकली (Kangana Ranaut)

कंगनानं ट्वीटच्या माध्यमातून शुभनीत सिंहवर टीका केली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जेव्हा तुमच्यावर संरक्षण करण्याचा विश्वास ठेवला जातो, परंतु तुम्ही त्या विश्वासाचा फायदा घेत ज्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा वापर  त्यांना मारण्यासाठी केला. हे शौर्याचे कृत्य नसून भ्याडपणाचे लज्जास्पद कृत्य आहे. नि:शस्त्र असलेल्या एका वृद्ध महिलेवर अशा भ्याड हल्ल्याची लाज वाटली पाहिजे. त्या लोकशाहीत निवडून आलेल्या एक महिला होत्या, शुभम जी इथे गौरव करण्यासारखे काही नाही. थोडी लाज बाळगा!"

कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. 

संबंधित बातम्या:

Shubhneet Singh : "पंजाब माझ्या रक्तात आहे"; 'त्या' पोस्टवर अखेर शुभनीत सिंहनं सोडलं मौन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Embed widget