Kangana Ranaut: "स्क्रिप्ट तयार आहे पण..." ; बिल्किस बानो यांच्यावर आधारित चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच बोलली कंगना
Kangana Ranaut: कंगना रनौतला एका नेटकऱ्यांनं नुकताच बिल्किस बानो (Bilkis Bano) यांच्यावर आधारित चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kangana Ranaut Film On Bilkis Bano: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. तिच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. कंगना रनौतला एका नेटकऱ्यांनं नुकताच बिल्किस बानो (Bilkis Bano) यांच्यावर आधारित चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्यानं विचारला प्रश्न
ट्विटरवर एका नेटकऱ्यानं कंगनाला प्रश्न विचारला की, "प्रिय कंगना मॅम, महिला सक्षमीकरणाबाबत तुमची तळमळ खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही बिल्किस बानो यांची कथा चित्रपटाच्या माध्यमातून सांगू शकता का?" नेटकऱ्याच्या या प्रश्नाचं कंगनानं उत्तर दिलं आहे.
कंगनाच्या उत्तरानं वेधलं लक्ष
नेटकऱ्याच्या प्रश्नाला कंगनानं उत्तर दिलं, "मला ती कथा बनवायची आहे, माझ्याकडे स्क्रिप्ट देखील तयार आहे, मी त्यावर तीन वर्षे काम केले आहे. पण नेटफ्लिक्स, अॅमेझॉन इन आणि इतर स्टुडिओने मला पत्र लिहिले की, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे अशी आहेत की ते तथाकथित राजकीय हेतूने प्रेरित चित्रपट बनवत नाहीत. जिओ सिनेमाने म्हटले आहे की, आम्ही कंगनासोबत काम करत नाही कारण ती भाजपला पाठिंबा देते आणि जिओ विलीनीकरणातून जात आहे. आता माझ्याकडे काय पर्याय आहेत?" कंगनाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
I want to make that story I have the script ready, researched and worked on it for three years but @netflix , @amazonIN and other studios wrote back to me that they have clear guidelines they don’t do so called politically motivated films, @JioCinema said we don’t work with… https://t.co/xQeVfc3SyI
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 9, 2024
कोण आहेत बिल्किस बानो?
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनजवळ साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले होते. या घटनेत अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मात्र संपूर्ण देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या.
3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये दंगलीची आग उसळली. ही आग बिल्किस बानो यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यावेळी 21 वर्षीय बिल्किस यांच्या कुटुंबात बिल्किस आणि त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी यांच्यासह 15 सदस्य होते. चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बिल्किस यांच्या कुटुंबावर 20-30 जणांनी शस्त्र घेऊन हल्ला चढवला. यामध्ये याप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांचा समावेश होता. त्यांनी बिल्किस बानो, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर तीन महिलांवर बलात्कार केला.ही घटना घडली त्यावेळी बिल्किस बानो पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. दंगलखोरांच्या क्रूरतेनंतर बिल्किस बानो सुमारे तीन तास बेशुद्ध पडलेल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :