(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Noti Binodini Biopic: कंगना रनौतच्या हाती आणखी एक बायोपिक; मोठ्या पडद्यावर साकारणार ‘नटी बिनोदिनी’
Noti Binodini Biopic: अभिनेत्री कंगना रनौतच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती लवकरच 'नटी बिनोदिनी' या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.
Noti Binodini Biopic: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना रनौत तिच्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित समस्यांवर बेधडकपणे आपली मते मांडते. दरम्यान, बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना एका प्रोजेक्टमध्ये आयकॉनिक सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री कंगना रनौत 'नटी बिनोदिनी' (Noti Binodini) यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौतच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती लवकरच 'नटी बिनोदिनी' या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रदीप सरकार यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.’
कंगनाने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कंगना रनौतने तिचा पुढचा चित्रपट साईन केला आहे. ज्यामध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि बंगाली थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासी उर्फ नटी बिनोदिनी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनचे नाव पुढे येत होते. पण, ही दमदार भूमिका बॉलिवूड क्वीन कंगना रनौतच्या हाती लागली आहे.
कोण आहेत नटी बिनोदिनी?
बिनोदिनी दासी अर्थात नटी बिनोदिनी हे चित्रपटांसह बंगाली थिएटरचे एक मोठे नाव होते. त्यांनी रंगमंचावर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या. आपण साकारत असलेल्या पात्रांवर प्रयोग करण्यात त्या माहिर होत्या. मंचावर चैतन्य महाप्रभूंची भूमिका साकारून बिनोदिनी जगभर प्रसिद्ध झाल्या. रंगमंचावर साकारलेल्या या भूमिकेने बिनोदिनी दासींना नव्या उंचीवर नेले. रिपोर्ट्सनुसार, बिनोदिनी दासी यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी प्रमिला, सीता, द्रौपदी, राधा, आयशा, कैकेयी, मोतीबाई आणि कपालकुंडला यासह 80 हून अधिक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
कंगनाकडे चित्रपटांची रांग!
सध्या कंगना रनौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘इमर्जन्सी’चं शूटिंग पूर्ण करून ती पुढच्या वर्षी या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू करणार आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटात ती मुख्य भूमिका अर्थात इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. कंगना लवकरच सर्वेश मारवाह दिग्दर्शित ‘तेजस’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती एका एअरफोर्स पायलटची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती 'इमर्जन्सी', 'सीता' आणि 'इमली' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या