Kangana Ranaut: 'लग्नात डान्स करणं,रात्री हिरोच्या रुममध्ये जाणं....'; कंगनाचं ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय
Kangana Ranaut : सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना तिची मतं लोकांसमोर मांडते. नुकतेच कंगनानं एक ट्वीट शेअर केला आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kangana Ranaut : बॉलिवूडची 'क्विन' अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कंगनाच्या पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत असतात. नेपोटिझम, राजकारण यासारख्या विषयावर कंगना सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना तिची मतं लोकांसमोर मांडते. नुकतेच कंगनानं एक ट्वीट पोस्ट केले आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले असून सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे.
कंगनाचं ट्वीट
कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'भिखारी फिल्म माफियानं माझ्या अॅटिट्यूडला 'अहंकार' असं म्हटलं. कारण मी दुसऱ्या मुलींसारखं हसणं, आयटम साँगवर डान्स करणं, लग्नात डान्स करणं, रात्री हिरोनं जर रुममध्ये बोलवलं तर जाणं यासारख्या गोष्टी करण्यास नकार दिला होता. मी वेडी आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच त्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला.'
'स्वत: सुधारण्याच्या ऐवजी ते मला सुधारण्याचा प्रयत्न करत होते. पण मला स्वत:साठी काहीही नको आहे, माझं सर्व गहाण ठेवून मी चित्रपट बनवला आहे, राक्षस निघून जातील आणि त्यासाठी मला कोणी ब्लेम करणार नाही.' असंही कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं. कंगनाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Is this attitude or integrity? Khud ko sudharne ki jageh woh mujhe sudharna chale hain, lekin chakkar yeh hai ki mujhe apne liye kuch bhi nahi chahiye, maine abhi apna sab girvi rakh ke ek film banayi hai, rakshashon ka safaya hoga heads will roll, no one should blame me 🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 27, 2023
कंगनाचे आगमी चित्रपट
2023 मध्ये कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. कंगना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या धाकड या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही. पण आता इमर्जन्सी हा चित्रपट किती कमाई करेल? या प्रश्नाचं उत्तर कंगनाच्या चाहत्यांना लवकरच मिळेल.
महत्वाच्या इतर बातम्या:
Kangana Ranaut: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडताच कंगना भडकली; 'माफिया' म्हणत शेअर केली पोस्ट