Kangana Ranaut Emergency Movie : अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा, अखेर इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा
Kangana Ranaut Emergency Movie Get Censor Certificate : अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डानं U/A सर्टिफिकेट दिलं आहे.
![Kangana Ranaut Emergency Movie : अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा, अखेर इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा kangana ranaut emergency movie gets censor board certificate film to be released with 10 major changes and 3 cuts marathi news Kangana Ranaut Emergency Movie : अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा, अखेर इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/da96072fb9facf13d0306b7d0dec8ef41725873966083322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Emergency Movie Release Date : अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला सेन्सॉर बोर्डाकडून दिलासा मिळाला आहे. कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर सेन्सॉर बोर्डानं इमर्जन्सी चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. इमर्जन्सी चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता, आता या चित्रपटात काही बदल केल्यानंतर सेन्सॉरनं या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता मात्र, सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्याता मुहूर्त हुकला. आता अखेर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं आहे.
अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा
अभिनेत्री कंगना रणौतचा इमर्जन्सी हा चित्रपट बराच काळ वादात अडकला होता. या चित्रपटाला विरोध करत ठिकठिकाणी निदर्शनही करण्यात आली. आता अखेर चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) इमर्जन्सी चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं आहे. यासोबतच चित्रपटातील काही सीन्स काढून टाकावे लागतील, अशा स्पष्ट सूचनाही निमार्त्यांना देण्यात आल्या आहेत.
इमर्जन्सी चित्रपटात 10 मोठे बदल
मीडिया रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने इमर्जन्सी चित्रपटाला रिलीज करण्याची परवानगी दिली आहे, पण यासाठी काही कडक सूचनाही दिल्या आहेत. रिलीजपूर्वी इमर्जन्सी चित्रपटात 10 मोठे बदल करावे लागणार आहेत. यासोबतच चित्रपटातून तीन मोठे सीन कापावे लागणार आहेत. या बदलांसोबतच चित्रपटात जिथे वादग्रस्त विधाने असतील तिथे वस्तुस्थिती दाखवावी, असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.
अखेर इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा
View this post on Instagram
तीन मोठे सीन कापावे लागणार
सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे की, जिथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड मिलहॉस निक्सन यांनी भारतीय महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे आणि कुठे ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टल चर्चिल यांनी भारतीय सशांसह पुनरुत्पादन करतात असे विधान केले आहे. या विधानाची सूत्रे दाखवावी लागतील. असं सांगत, सेन्सॉर बोर्डाने कंगनाच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिकामध्ये 10 मोठ्या बदलांची यादी पाठवली आहे.
चित्रपटाला प्रचंड विरोध झाला
इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली आहे. इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट आधी लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यासोबतच शीख समुदायाचा विरोधही पाहता, चित्रपट पुढे ढकलणे आवश्यक मानलं गेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे मुलगी; डीपी दादानं घेतली गोलीगतची 'सेटिंग' लावायची जबाबदारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)