एक्स्प्लोर
दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन हॉस्पिटलमध्ये
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता-सिनेनिर्माता कमल हसन हॉस्पिटलमध्ये भरती आहे. दोन आठवड्यांपूर्वी पायऱ्यांवरून पडल्यामुळे त्याच्या पायाचे हाड मोडले होते. कमल हसनच्या निकटवर्तीयांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. तो अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता आहे. सध्यातरी त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कमल हसनला किमान एका महिन्याची सक्तीची विश्रांती डॉक्टरांनी सांगितली असून मागच्याच आठवड्यात त्याने आपल्या आगामी त्रिभाषी सिनेमासाठी दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगची तयारी दाखवली होती. परंतु काही कारणांमुळे या सिनेमाचे शूटिंग सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
कमल हसन सध्या 'शब्बास नायडू'च्या दिग्दर्शनासोबतच अभिनयही करतो आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये बनत असून संगीत इलयाराजा यांनी दिले आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement