Kamaal Rashid Khan : 'मी बदला घ्यायला परत आलोय'; जामीन मिळाल्यानंतर केआरकेचं पहिलं ट्वीट
जामीन मिळाल्यानंतर केआरकेनं पहिलं ट्वीट शेअर केलं आहे.
Kamaal Rashid Khan : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरकेला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी पोलिसांनी केआरकेला अटक केली होती.कमाल आर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता जामीन मिळाल्यानंतर केआरकेनं पहिलं ट्वीट शेअर केलं आहे.
केआरकेनं शेअर केलं ट्वीट
केआरकेनं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी बदला घ्यायला परत आलोय' या ट्वीटमध्ये रेड अँग्री स्माईली इमोजीचा वापर देखील केआरकेनं केला आहे. केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. केआरकेच्या या ट्वीटला आतापर्यंत 28 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.
I am back for my vengeance.😡
— KRK (@kamaalrkhan) September 11, 2022
याआधी केआरकेच्या अकाऊंटवरुन त्याच्या मुलानं ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये काही लोक केआरकेला मारण्यासाठी त्याचा छळ आहेत, असा दावा केआरकेचा मुलगा फैजलने ट्विटमध्ये केला होता. फैजलनं ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'मी केआरकेचा मुलगा फैजल कमाल आहे. माझ्या वडिलांना मारण्यासाठी मुंबईत काही लोक त्यांना त्रास देत आहेत. मी 23 वर्षांचा आहे आणि लंडनमध्ये राहतो. माझ्या वडिलांना कशी मदत करावी हे मला कळत नाही. मी अभिषेक बच्चन, अभिनेता रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांचे जीव वाचवण्याची विनंती करतो.'
कोण आहे केआरके?
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं.
बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. त्याच्या ट्विट्सची आणि पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत असते. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :