Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Kalki 2898 AD advance booking Box Office : फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर पूर्ण भारतात या चित्रपटाची क्रेझ निर्माण झाली आहे. पहिल्या दिवसाच्या शोसाठी अनेक चाहत्यांनी तिकिटे बुक केली आहेत. मात्र, काही ठिकाणी या चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमती ऐकल्यास तुमचे डोळे विस्फारतील.
Kalki 2898 AD advance booking Box Office : सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) रिलीज होण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे. या चित्रपटाची उत्सुकता चांगली ताणली गेली आहे. फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर पूर्ण भारतात या चित्रपटाची क्रेझ निर्माण झाली आहे.
कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक एका वर्षापूर्वी सॅन डिएगो कॉमिक कॉन येथे रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती.
'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये पहिल्या दिवसाच्या शोसाठी अनेक चाहत्यांनी तिकिटे बुक केली आहेत. मात्र, काही ठिकाणी या चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमती ऐकल्यास तुमचे डोळे विस्फारतील.
'कल्की 2898 एडी'च्या तिकिटांची किंमत 100 ते 1100 रुपयांच्या घरात आहे. मात्र एका शहरात या चित्रपटाची तिकिटे 2300 रुपयांना विकली जात आहेत. एवढं महाग तिकीट हैदराबादमध्ये विकले जाईल असा अंदाज होता. मात्र, हे महागडे तिकीट मुंबईत विकले गेले आहे.
View this post on Instagram
2300 रुपयांना एका तिकीटाची विक्री
'न्यूज 18' ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील मॅशन आयनॉक्स: जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये चित्रपटाचे एक तिकीट 2300 रुपयांना विकले गेले आहे. त्याशिवाय, वरळीतील अॅट्रिया मॉलमधील आयनॉक्स: इनसिग्निया आणि लोअर परेल येथील पीव्हीआर आयकॉन फिनिक्स पॅलोडियमध्ये 1760 आणि 1560 रुपयांना तिकिटांची विक्री झाली आहे. यामध्ये कोणताही कर, सेवा आकार जोडण्यात आला नाही.
'कल्की 2898 AD' चा ट्रेलर याच महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी असणार आहे. या सायफाय चित्रपटात प्रभास भैरवाच्या भूमिकेत दिसणार आहे. अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत. ट्रेलरच्या शेवटी कमल हासनचा लूक समोर आला. कमल हासन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे.