News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

जस्टिन बिबरच्या शोमुळे महाराष्ट्राला 3.40 कोटी!

FOLLOW US: 
Share:
मुंबई: कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टमध्ये त्याने स्वत: गाणी न गाता, केवळ लिप सिंक केल्याचा आरोप होत आहे. असं असलं तरी दुसरीकडे जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत.  हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बिबरच्या कार्यक्रमावरील विविध टॅक्समुळे महाराष्ट्र सरकारला ही रक्कम मिळाली आहे. दिल्लीतील व्हाईट फॉक्स कंपनीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स टॅक्स म्हणून 3 कोटी 7 लाख रुपये जमा करुन घेतले होते. त्यावेळी 35 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा जास्त लोक आल्याने आयोजकांना आणखी 33 लाख भरावे लागतील, असं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, बिबरच्या कॉन्सर्टसाठी देश-विदेशातून 40 हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांनी 15 लाख रुपये अॅडव्हान्सरुपी घेतले होते. सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी आम्ही कॉन्स्टेबलसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये तर अधिकाऱ्यासाठी 2500 रुपये आकारले होते, असं उपायुक्त तुषार दोषी यांनी एचटीला सांगितलं. "30 अधिकाऱ्यांसह जवळपास 700 पोलीस या कॉन्सर्टसाठी तैनात होते. अजून आम्ही हिशेब केलेला नाही, तो करुन आयोजकांना बिल पाठवून देऊ. एकदा कार्यक्रम झाल्यानंतर पैसे वसूल करणं मोठं जिकीरीचं काम असतं. त्यामुळेच आम्ही अॅडव्हान्स रक्कम घेतो", असंही त्यांनी सांगितलं.
Published at : 13 May 2017 01:30 PM (IST) Tags: justin bieber live concert justin bieber in India justin bieber in Mumbai Justin Bieber जस्टिन बिबर Marathi News maharashtra govt abp majha Latest Marathi News

आणखी महत्वाच्या बातम्या

ठरलं तर! सलमान-रश्मिका यांची जोडी पुन्हा एकदा जमणार, 'सिकंदर'नंतर आता दोघेही 'या' चित्रपटात करणार रोमान्स!

ठरलं तर! सलमान-रश्मिका यांची जोडी पुन्हा एकदा जमणार, 'सिकंदर'नंतर आता दोघेही 'या' चित्रपटात करणार रोमान्स!

सलमानच्या 'सिकंदर'मध्ये आणखी एका हिरोईनची एन्ट्री; 24 वर्षांची तरुणी भाईजानसोबत दिसणार; बॉलिवुडच्या बड्या घराण्याशी आहे संबंध!

सलमानच्या 'सिकंदर'मध्ये आणखी एका हिरोईनची एन्ट्री; 24 वर्षांची तरुणी भाईजानसोबत दिसणार; बॉलिवुडच्या बड्या घराण्याशी आहे संबंध!

Jewel Thief : जखमी झाल्यानंतर वाघ परतला! सैफ अली खानच्या 'ज्वेल थिफ' चित्रपटाचा टिझर रिलीज, 'नवाब'च्या डॅशिंग लुकची चर्चा!

Jewel Thief : जखमी झाल्यानंतर वाघ परतला! सैफ अली खानच्या 'ज्वेल थिफ' चित्रपटाचा टिझर रिलीज, 'नवाब'च्या डॅशिंग लुकची चर्चा!

"ऐश्वर्या रायला सोडलं नाही, तर मी कोण...", बॉडी शेमिंग करणाऱ्यांना स्वरा भास्करची चपराक

Saif Ali Khan : सैफ अली खानकडील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती? पटौदी नवाबची एकूण संपत्ती ऐकून व्हाल थक्क

Saif Ali Khan : सैफ अली खानकडील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती? पटौदी नवाबची एकूण संपत्ती ऐकून व्हाल थक्क

टॉप न्यूज़

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर

गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी

गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी

Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं

Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं