(Source: ECI/ABP News/ABP Majha)
John Abraham: जॉन अब्राहमनं मुंबईत खरेदी केला आलिशान बंगला; किंमत वाचून डोळे विस्फारतील
John Abraham New Property: जॉन अब्राहमने (John Abraham) मुंबईमध्ये (Mumbai) आलिशान बंगला घेतला आहे. जाणून घ्या बंगल्याची किंमत...
John Abraham New Property: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षी अनेक कलाकारांनी नवे अपार्टमेंट घेतले. अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) देखील आता मुंबईमध्ये (Mumbai) आलिशान बंगला घेतला आहे. जॉन अब्राहमने मुंबईतील खार येथील लिंकिंग रोडमधील एका बंगल्यासाठी डील फायनल केली.
जॉनच्या नव्या बंगल्याची किंमत (John Abraham New Bungalow)
जॉनच्या या नव्या बंगल्याची जवळपास किंमत 75 कोटी रुपये आहे, असं म्हटलं जात आहे. IndexTap.com नुसार, जॉननं 27 डिसेंबर 2023 रोजी 70.8 कोटी रुपयांच्या एग्रीमेंटवर स्वाक्षरी केली होती. 4.25 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आले. जॉनने खरेदी केलेल्या बंगल्याचे क्षेत्रफळ 5 हजार 416 स्क्वेअर फूट आहे. जॉनची खरेदी केलेली ही नवीन प्रॉपर्टी आधी प्रवीण नाथलाल शहा आणि कुटुंबीयांची होती.
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनी सांगितले की, हा प्लॉट लिंकिंग रोडच्या प्राइम एरियामध्ये आहे. रिपोर्टनुसार, Lias Foras चे पंकज कपूर म्हणाले, "लिंकिंग रोडवरील किरकोळ दुकानाचे भाडे 800 रुपये प्रति चौरस फुटापेक्षा जास्त आहे. हे भारतातील सर्वात महागडे रिटेल मार्केटपैकी एक आहे."
रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत आता जॉन अब्राहमचा समावेश आहे. 2009 मध्ये, त्याने रतनश या पारशी कुटुंबाकडून पेटिट शाळेजवळील युनियन पार्कमध्ये एक प्राइम प्लॉट विकत घेतला होता.
View this post on Instagram
जॉनचे चित्रपट (John Abraham Movies)
जॉन अब्राहम हा गेल्या वर्षी शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. जॉनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. पठाण या चित्रपटात शाहरुख आणि जॉनसोबतच दीपिकानं देखील महत्वाची भूमिका साकारली. आता जॉनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गरम मसाला (2005), टॅक्सी क्रमांक 9211 (2006), रेस 2 (2013), शूटआउट अॅट वडाळा (2013), आणि मद्रास कॅफे (2013), दोस्ताना (2008) या जॉनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॉन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.
संबंधित बातम्या:
john Abraham : चाहत्यानं केलेल्या कृत्यामुळे जॉन भडकला; लगावली कानशिलात