(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jhimma 2 : 'झिम्मा 2'ची वाटचाल 10 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असून लवकरच 10 कोटींचा टप्पा पार करेल.
Jhimma 2 Box Office Collection : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. आता हा सिनेमा लवकरच 10 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे.
'झिम्मा' हा सिनेमा कोरोनानंतर प्रदर्शित झाला. या सिनेमाने हिंदी सिनेमांनाही मागे टाकलं. प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत होते. दोन वर्षांनंतर 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'झिम्मा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Jhimma 2 Box Office Collection Day 6)
'झिम्मा 2' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने ओपनिंग डेला 0.95 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 1.77 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.5 कोटी, चौथ्या दिवशी 1.5 कोटी, पाचव्या दिवशी 0.55 कोटी, सहाव्या दिवशी 0.70 कोटींची कमाई केली. रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 7.07 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवेल.
पहिला दिवस : 0.95 कोटी
दुसरा दिवस : 1.77 कोटी
तिसरा दिवस : 2.5 कोटी
चौथा दिवस : 1.5 कोटी
पाचवा दिवस : 0.55 कोटी
सहावा दिवस : 0.70 कोटी
एकूण कमाई : 7.07 कोटी
हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित सुहास जोशी (Suhas Joshi), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा 2’ हा सिनेमा 24 नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
View this post on Instagram
'झिम्मा 2' हा सिनेमा पाहायला प्रेक्षक सहकुटुंब जात आहेत. तर अनेक महिलांचे ग्रुपदेखील मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा आवडत आहे. स्वत: शोधायला भाग पाडणारा असा हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना भावत आहे. उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट आणि कमाल दिग्दर्शन असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणार आहे.
संबंधित बातम्या