एक्स्प्लोर

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित; नेमकं प्रकरण काय?

Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासजार जया प्रदा (Jaya Prada) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जया प्रदा या मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. राजकारणातही त्या चांगल्याच सक्रिय आहेत.  पण आता मात्र त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. त्यांना अटक करण्यासाठी खास टीम तयार करण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. उत्तरप्रदेश आणि मुंबईला त्यांची टीम रवाना झाली आहे. काही ठिकाणी जया प्रदा यांना अटक करण्यासाठी छापेमारीदेखील सुरू आहे.

जया प्रदा यांच्याविरोधात न्यायालयाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 2019 मधील प्रकरणामुळे जया प्रदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जया प्रदा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकदा त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अनेकदा आदेश जेऊनही त्या न्यायालयात उपस्थित राहिलेल्या नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

जया प्रदा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूरात भाजपने उमेदवारी दिली होती. पण या निवडणुरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

स्वार पोलीस ठाण्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जया प्रदा यांनी आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे. त्यावेळी आचार संहिता लागू असताना त्यांनी एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. तसेच केमरी भागातील एका गावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावनी एमपी-एमएलए स्पेशल न्यायालयात सुरू आहे. अभिनेत्रीवर सातव्यांदा अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. 

कोण आहेत जया प्रदा? (Who is Jaya Prada)

जया प्रदा अभिनेत्री असण्यासह राजकारणातदेखील सक्रीय आहेत. कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 2004 ते 2014 या काळात त्या उत्तर प्रदेशातील राजपूर येथील खासदार होत्या. मवाली, तोहफा, आखिरी रास्ता, औलाद, घर-घर की कहानी, मैं तेरा दुश्मन, ऐलान-ए-जंग, जादुगर आणि आज का अर्जुन, अशा अनेक सिनमांचा त्या भाग आहेत. भारतीय मनोरंजनसृष्टीतील महान अभिनेत्रींपैकी जया प्रदा एक आहेत.

संंबंधित बातम्या

Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget