Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूर लग्न करणार? बॉयफ्रेंड शिखरसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली, "आम्ही दोघं..."
Janhvi Kapoor & Shikhar Pahariya : अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर कायम पाहायला मिळते. जान्हवीने एका मुलाखतीत लग्नाच्या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच पर्सनल लाईफमुळेही खूपर चर्चेत असते. अलिकडे जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिचा बॉयफ्रेंड (Boyfriend) शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) याच्यासोबत अनेकदा दिसली. ही जोडीने वेळोवेळी सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. मंदिरात जाणं असो किंवा बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये हे दोघे नेहमी एकत्र दिसतात. शिखर आणि जान्हवी अलिकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात एकत्र दिसले होते.
अभिनेत्री जान्हवी कपूर लग्न करणार?
जान्हवी आणि शिखर वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. हे कपल लग्न कधी करणार याबाबत आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर कायम पाहायला मिळते. जान्हवी कपूरने अलीकडेच एका मुलाखतीत लग्नाच्या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
बॉयफ्रेंड शिखरसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली...
जान्हवी कपूरने एका मुलाखतीत शिखरसोबत लग्न करण्याबाबत तिने सांगितलं की, 'मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. लग्नाबाबत मला किंवा त्याच्याकडे सध्या वेळ नाही.' जान्हवी आणि शिखर सध्या रिलेशनमध्ये आहेत आणि स्वत:चं व्यावसायिक आयुष्य आणि डेटिंग लाईफ इन्जॉय करत आहेत. मात्र, सध्या तरी दोघांचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं जान्हवीने मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने हे वक्तव्य केलं आहे.
दर महिन्याला ब्रेकअप
जान्हवीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'तिला मासिक पाळी सुरू झाल्यावर ती दर महिन्याला ब्रेकअप करायची. माझ्या मासिक पाळीच्या काही वर्षांमध्ये मी दर महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करायची. सुरुवातीचे दोन-तीन महिने बॉयफ्रेंडही शॉकमध्ये व्हायचा, पण त्यानंतर त्यालाही हे कळलं आणि मग जान्हवीने ब्रेकअप केल्यावर तो त्यावर 'इट इज ओके' म्हणायचा. जान्हवी पुढे म्हणाली की, त्यानंतर दोन दिवसांनी मी रडत त्याच्याकडे जायचे आणि सॉरी म्हणायचे, असंही तिने सांगितलं. दरम्यान, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया आधी डेट करत होते आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झालं होतं.
View this post on Instagram
मात्र आता त्यांचं पुन्हा पॅचअप झालं आहे. दोघेही प्रत्येक फंक्शनमध्ये एकत्र दिसतात.
जान्हवी 'उलझ' चित्रपटामध्ये झळकणार
अभिनेत्री जान्हवी कपूर सुधांशू सारिया दिग्दर्शित 'उलझ' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर आला होता, ज्यामध्ये ती IFS ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'उलझ' चित्रपटात जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, राजेश तैलंग, मियांग चांग आणि जितेंद्र जोशी हे कलाकार त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील .