Jacqueline Fernandez : जॅकलिन आणि सुकेशचा आणखी एक फोटो व्हायरल, 'त्या' फोटोवर जॅकलिन म्हणाली...
Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसचा सुकेश चंद्रशेखरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jacqueline Fernandes Instagram : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सामिल होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) जोडले जात आहे. त्यामुळे जॅकलिन पुन्हा एकदा चर्चेत आली. सध्या जॅकलिनचे सुकेशसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर जॅकलिन आणि सुकेशचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी जॅकलिन फर्नांडिसला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. अशातच जॅकलिनने तिचे अशापद्धतीचे फोटो व्हायरल न करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना केले आहे. जॅकलिन पुढे म्हणाली,"या देशातील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि आदर दिला आहे. सध्या मी एका कठीण परिस्थितीचा सामना करत आहे".
View this post on Instagram
सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच महागडी जनावरं
सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Chandigarh Kare Aashiqui on OTT : आयुष्मान खुरानाचा 'चंदीगड करे आशिकी' आता प्रेक्षकांना पाहता येणार नेटफ्लिक्सवर
Allu Arjun Upcoming Movies : अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित, 'पुष्पा'चा दुसरा भाग वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला
Nafisa Ali Tests Positive : अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण, गोव्यातील रुग्णालयात दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha