एक्स्प्लोर
'बागी-2' मध्ये जॅकलीन माधुरीच्या 'एक दो तीन'वर थिरकणार!
या गाण्यातील जॅकलीनचा कॉश्च्यूम प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने बनवला आहे. हा ड्रेस माधुरीच्या ड्रेससारखाच फारच कलरफूल आहे. पण जॅकनीच्या कॉश्च्यूममध्ये थोडा बदल केला आहे.

मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची प्रमुख भूमिका असलेला 'बागी 2' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या अॅक्शन-थ्रिलर सिनेमात जॅकलीन फर्नांडिस धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय 'एक दो तीन' गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 'तेजाब'मधील हे हिट गाणं रिबूट केलं जात आहे. आता या गाण्यातील जॅकलीनचा लूक समोर आला आहे. या गाण्यातील जॅकलीनचा कॉश्च्यूम प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने बनवला आहे. हा ड्रेस माधुरीच्या ड्रेससारखाच फारच कलरफूल आहे. पण जॅकनीच्या कॉश्च्यूममध्ये थोडा बदल केला आहे. फोटोमध्ये जॅकलीन फारच बोल्ड दिसत आहे. आता 80 च्या दशकातील ह्या सुपरहिट गाण्याला जॅकलीन किती न्याय देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. एका मुलाखतीत जॅकलीन म्हणाली होती की, "माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर पुन्हा डान्स करणं माझ्यासाठी कठीण काम होतं. आम्ही जुन्या गाण्याला मॅच करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. माधुरीसारखा डान्स कोणीही करु शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे." 'बागी-2' हा चित्रपट 30 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात टायगर श्रॉफ, दिशा पटानी यांच्याशिवाय प्रतीक बब्बर, रणदीप हुड्डा, दीपक डोबरियाल आणि मनोज वाजपेयी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. साजिद नाडियावाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'बागी-2' हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी'चा सीक्वेल आहे. यात श्रद्धा कपूर टायगरच्या अपोझिट दिसली होती. पण यावेळी सिनेमात टायगरची कथित गर्लफ्रेण्ड दिशा पटानीची निवड करण्यात आली आहे. 'एक, दो, तीन' गाण्याचा टीझर
आणखी वाचा






















