गदर फेम अमिषा पटेल पाकिस्तानची सून होणार? 'त्या' अभिनेत्याबद्दल विचारताच म्हणाली; तोही सिंगल मिही...
Amisha Patel : अमिषा पटेल हिचे नाव एका पाकिस्तानी अभिनेत्यासोबत जोडले जाते. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. या अभिनेत्याने भारतीय चित्रपटांतही काम केलेले आहे.
मुंबई : कहो ना प्यार है या चित्रपटामुळे संपूर्ण देशाला माहिती झालेली अमिषा पटेल ही अभिनेत्री वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिचा गदर-2 हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. गदर या चित्रपटाला आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जाते. विशेष म्हणजे या चित्रपटातील गीतांची छाप अजूनही लोकांच्या मनावर असून त्यामुळेच अमिषा पटेल ही अभिनेत्रीदेखील अनेकांना आजही तेवढीच आवडते. दरम्यान, ही अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचे पाकिस्तानच्या एका कलाकारासोबत नाव जोडले जात आहे.
अमिषा पटेल अजूनही सिंगल
अमिषा पटेल 49 वर्षांची आहे. अजूनही ती सिंगलच आहे. कोह ना प्यार है हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट आले. यातील काही चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. आजकाल तिचे नाव पाकिस्तान अभिनेता इम्राम अब्बास याच्यासोबत घेतले जाते. याच अफवांवर तिने आता स्पष्टीकरण दिले आहे.
अमिषा पटेल खरंच अब्बाससोबत लग्न करणार का?
नुकतेच अमिषा पटेल या अभिनेत्रीने हिंदी रश या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमिषा पटेलला इम्रान अब्बास याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'पाकिस्तानचा अभिनेता इम्रान अब्बाससोबतचे तुमचे काही फोटो व्हायरल झाले होते. तुम्ही त्याच्यासोबत लग्न करणार आहात का? नेमका प्रकार काय आहे?' असे अमिषाला विचारण्यात आले. यावर उत्तर देताना 'लग्नाची ही अफवा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू आहे. पण आमचे लग्न झाले का? भारताच्या बाहेर एखादा कार्यक्रम असला की आम्ही भेटतो. आम्ही चांगले मित्र आहोत. बाकी काहीही नाही. लोकांना फक्त अफवा पसरवायला संधी हवी असते. दोन चांगल्या दिसणाऱ्या व्यक्ती एकत्र दिसल्या की अफवा चालू होतात. तो सिंगल आहे. मी पण अद्याप सिंगल आहे. त्यामुळे आमचे लग्न व्हावे अशी इच्छा लोक व्यक्त करतात. त्यानंतर आमच्या लग्नाची अफवा पसरते. मात्र तसे काही नाही," असे अमिषा पटेलने स्पष्ट केले.
View this post on Instagram
इम्रान अब्बास नेमका कोण आहे?
इम्रान अब्बास हा पाकिस्तानी अभिनेता आहे. त्याचा जन्म 15 ऑक्टोबर 1982 रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे झालेला आहे. इम्रान अब्बास हा पाकिस्तानची सिनेसृष्टी तसेच टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहे. हा अभिनेता भारतातील ‘क्रिएचर 3डी’ (2014) तसेच ऐ दिल है मुश्किल (2016) या चित्रटांत दिसला होता. त्याने पाकिस्तानच्या अनेक चित्रपटांत तसेच टीव्ही सिरियलमध्ये काम केलेलं आहे. तो अनेकवेळा अमिषा पटेलसोबत स्पॉट झालेला आहे.
हेही वाचा :