एक्स्प्लोर
आयर्न मॅनच्या महागड्या सूटची चोरी, किंमत तब्बल...
अत्यंत महागड्या या सूटची किंमत 3 लाख 25 हजार डॉलर म्हणजेच तब्बल 2.18 कोटी रुपये इतकी आहे.
लॉस एंजेलिस : जगाला वाचवणाऱ्या अॅव्हेंजर्सची सेना सध्या अतिशय त्रासलेली आहे. कारण संकटांवर मात करणाऱ्या या सुपरहिरोंपैकी एकाचे कपडे चोरीला गेले आहेत. हॉलिवूड सिनेमातील सुपरहिरो आयर्न मॅनचा खराखुरा सूट चोरीला गेला आहे.
लॉस एंजेलिस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरच्या लाल आणि सोनेरी रंगाच्या सूटची चोरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने आयर्न मॅनच्या रुपात 2008 मधील 'ओरिजनल सुपरहिरो' सिनेमात हा सूट परिधान केला होता.
लॉस एंजेलिसच्या उत्तरेत असलेल्या पकोईमाच्या प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधून हा सूट गायब झाल्याचं मंगळवारी (8 मे) निदर्शनास आली. अत्यंत महागड्या या सूटची किंमत 3 लाख 25 हजार डॉलर म्हणजेच तब्बल 2.18 कोटी रुपये इतकी आहे. पण हा सूट फेब्रुवारी ते 25 एप्रिलच्या दरम्यान गायब झाल्याचा दाव, प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
सूटच्या चोराला पकडणं ही आपची प्राथमिकता आहे. सध्या कोणताही पुरावा मिळालेले नाहीत, असं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement