Kantara: ऋषभ शेट्टी नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता कांतारामधील शिवा ही भूमिका; पण...
'कांतारा' (Kantara) या चित्रपटतील ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) अभिनायाचं अनेकांनी कौतुक केलं.ऋषभ शेट्टी यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

Kantara: 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. या चित्रपटतील ऋषभ शेट्टीच्या अभिनायाचं अनेकांनी कौतुक केलं. पण ऋषभ शेट्टीच्या ऐवजी दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) हा या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारणार होते. एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं याबाबत सांगितलं.
काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
कांतारा या चित्रपटातील शिवा या भूमिकेबाबात एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टी म्हणाला, 'मला शिवा ही भूमिका साकारायची होती पण या चित्रपटाची निर्मिती करण्याआधी मी या भूमिकेची ऑफर अभिनेता पुनीत राजकुमार यांना दिली. त्यांना मी चित्रपटाची कथा देखील सांगितली होती. पण ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते. एकेदिवशी मला त्यांनी फोन केला आणि म्हणाले की हा चित्रपट तुम्ही माझ्याशिवाय करा कारण माझी वाट तुम्ही पाहिली तर यावर्षी तुम्ही हा चित्रपट करु शकणार नाहीत.'
पुनीत राजकुमारचे निधन होण्याच्या दोन दिवस आधी 'बजरंगी 2' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये ऋषभ शेट्टीने आणि पुनीत यांची भेट झाली होती. याबाबत मुलाखतीमध्ये ऋषभनं सांगितलं की, "त्यावेळी त्यांनी मला कांताराबद्दल विचारले होते, मी त्यांना शूटचे काही फोटोही दाखवले, त्यांनी माझ्या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आणि ते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते." अभिनेता पुनीत राजकुमारचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.
कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
