Indira Gandhi Birth Anniversary : 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका; लूकचं प्रेक्षकांनी केलं कौतुक
Indira Gandhi : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे.
Indira Gandhi Birth Anniversary : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची आज जयंती आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पंतप्रधान या नात्याने त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांना 'आर्यन लेडी' असेही म्हटले जाते. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'ऑंधी'(Aandhi), 'बेल बॉटम' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमात अनेक अभिनेत्रींनी त्यांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.
ऑंधी (Aandhi) :
1975 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'ऑंधी' हा सिनेमा चांगलाच गाजला. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. तर गुलजारांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. इंदिरा गांधी आणि त्यांचे पती फिरोज यांच्या नात्यावर भाष्य करणारा 'ऑंधी' हा सिनेमा आहे. आणीबाणीच्या काळात या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. पण नंतर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
इंदू सरकार (Indu Sarkar) :
भारतातील आणीबाणीवर भाष्य करणारा 'इंदू सरकार' हा सिनेमा आहे. या सिनेमात रत्नाकर मतकरी यांची कन्या सुप्रिया विनोद इंदिरा गांधीच्या भूमिकेत झळकली होती. या सिनेमातील सुप्रियाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. हा सिनेमा राजकारणावर आधारित आहे.
रेड और थलायवी (Red Aur Thalaivi) :
'रेड और थलायवी' या सिनेमात फ्लोरा जेकब मुख्य भूमिकेत होती. ती या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून आली होती. फ्लोराने तिच्या अभिनयाने सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं.
बेल बॉटम (Bell Bottom) :
लारा दत्ताने 'बेल बॉटम' या सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. लाराने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
इमरजेंसी (Emergency) :
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'इमरजेंसी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरादेखील कंगना सांभाळत आहे. 1975 मधील भारताच्या आणीबाणीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या