एक्स्प्लोर
पनामा पेपर्सप्रकरणी बिग बींसह 33 जण आयकर विभागाच्या रडारवर
पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यासह भारतातील अनेक बड्या व्यक्तींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाचे एक पथक ब्रिटिश वर्जिन आइसलँडला रवाना झालं आहे.
मुंबई : पनामा पेपर प्रकरणाचं वादळ आता भारतातही घोंघावू लागलं आहे. या प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींची नावं असल्याने, भारतीय आयकर विभागाचं एक पथक यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्यासाठी ब्रिटिश वर्जिन आइसलँडला रवाना झालं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पनामा पेपर्स प्रकरणातून जी नावे समोर आली आहेत, त्यातील 33 प्रकरणात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी इतर देशांकडूनही माहिती गोळा करत असल्याचे आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय.
पनामा पेपर प्रकरणामुळे काही दिवसांपापूर्वी पाकिस्तानाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पायउतार व्हावे लागले होते. यानंतर भारतीय आयकर विभाग या प्रकरणी तपासात ढिसाळपणा दाखवत असल्याचा आरोप होत होता. त्यापार्श्वभूमीवर आयकर विभागाने तपासाचा वेग वाढवला आहे.
दुसरीकडे अमिताभ यांचा पनामा पेपरमधील एकाही कंपनीशी संबंध नाही. त्यामुळे त्यांची थेट चौकशी सुरु करणे शक्य नाही. पण याच्याशी संबंधित अधिक माहिती गोळा करावी लागत असल्याचं तपास अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीलाच त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण भारतीय नियमांनुसार परदेशात पैसे पाठवले असल्याचं या आधीच स्पष्ट केलं होतं.
पनामा पेपर्समध्ये भारतातील कोण कोण आहे?
भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अदानी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसनं दिलं होतं.
इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झालाय. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचंही सांगितलं जातं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.
पनामा पेपर्स काय आहे?
पनामा पेपर्स ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे.
पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.
11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.
यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.
संबंधित बातम्या
पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं
पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
पनामा पेपर्समध्ये कोणा कोणाची नावं आहेत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement