एक्स्प्लोर
Advertisement
सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव!
पोलिसांच्या माहितीनुसार आयशा श्रॉफनं तिचा मित्र साहील खानच्या कॉलची माहिती मागवली होती.
मुंबई: कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीनंतर आता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा आणि बॉलिवूडची क्वीन कंगणा रनौतही पोलिसांच्या रडारवर आहे.
कारण पोलिसांच्या माहितीनुसार आयशा श्रॉफनं तिचा मित्र साहील खानच्या कॉलची माहिती मागवली होती.
साहील आणि आयशा यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरुन प्रचंड वाद झाला होता. तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आयशानं साहीलचे कॉल रेकॉर्ड मागवल्याची शक्यता आहे.
नवाझवरील सीडीआर हेरगिरीच्या आरोपावर पत्नी आलिया म्हणते...
विशेष म्हणजे आज ठाणे पोलीस आयशा श्रॉफची चौकशी करणार असल्याचंही कळतंय.
दुसरीकडे कंगणानेही कॉल रेकॉर्ड मागवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र कंगणानं कुणाचे कॉल रेकॉर्ड मागवले याची माहिती हाती आलेली नाही. देशातील पहिली महिला हेर रजनी पंडित यांना अटक झाल्यानंतर राजकीय आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत.
नवाजुद्दीनवरही आरोप
पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे.
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिजवान सिद्दिकीला यांना मुंबईतील वर्सोवाच्या कार्यालयातून क्राईम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. रिजवान सिद्दिकी या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते. याप्रकरणी नवाजुद्दीनसह त्याच्या वकिलांना वारंवार ठाणे पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र तरीही ते कोर्टासमोर हजर न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
अनेकांना अटक
सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
रजनी पंडित यांना 40 दिवसांनी जामीन
सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 2 फेब्रुवारीला अटक झाली होती. त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. तब्बल 40 दिवसांनंतर रजनी पंडित यांना जामीन मंजूर होऊन, त्या तुरुंगाबाहेर आल्या.
ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.
काय आहे सीडीआर प्रकरण?
ठाणे गुन्हे शाखेने कॉल डिटेल रेकॉर्डच्या खरेदी-विक्री प्रकरणात देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर मोठं रॅकेट समोर आले.
कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप आहे. याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचने दादरमधून रजनी पंडित यांना अटक केली होती.
सीडीआर लीक प्रकरणात ठाणे पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांसह पोलिसही चौकशीच्या घेऱ्यात होते. तापर्यंत 7 मोबाईल कंपन्या, 4 विमा कंपन्या संशयाच्या घेऱ्यात आहेत.
सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच, व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, आयडिया, टाटा, जिओ आणि यूनिनॉर या 7 टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन खरेदी केले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करणार आहे, जेणेकरुन सीडीआर कंपनीकडून चोरला गेला की या कंपन्यांमधीलच कुणी व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे.
रजनी पंडित यांना लेडी जेम्स बाँड असंही संबोधलं जातं. 1991 मध्ये त्यांनी अधिकृतपणे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या :
नवाझवरील सीडीआर हेरगिरीच्या आरोपावर पत्नी आलिया म्हणते...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement