एक्स्प्लोर
वाईट अभिनेत्री बेड शेअर करायला राजी, खासदाराच्या वक्तव्याने वाद

तिरुअनंतपुरम : अभिनेत्री वाईट असेल, तर ती बेड शेअर करण्यास राजी होते, असं वक्तव्य करणाऱ्या मल्ल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार इनोसंट वरीद थेक्केथला यांच्यामुळे वादंग माजला आहे. मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना थेक्केथला यांनी हे उत्तर दिलं. 'काळ बदलला आहे. एखाद्या महिलेकडे असभ्य मागणी केली, तरी ती क्षणभराचाही विचार न करता मीडिया आणि प्रेक्षकांसमोर उघडं पाडते.' असंही ते म्हणाले. 'जर ती अभिनेत्री चांगली असेल, तर ती अशा असभ्य मागणीची बातमी तुमच्यासोबत 'शेअर' करते. मात्र ती वाईट असेल, तरी ती त्याच्यासोबत बेड 'शेअर' करते.' असं थेक्केथला म्हणाले. केरळातील अभिनेत्रीचं अपहरण आणि विनयभंग प्रकरणी अभिनेते दिलीप, मोहनलाल, मामुट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मल्ल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनला या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























