एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तर पाकिस्तानच्या राष्ट्रगीतालाही उभा राहीन : सोनू निगम
राष्ट्रगीत हा सन्मानाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. मला वाटतं सिनेमागृह, रेस्टॉरंट यासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत लावू नये.' असं सोनू म्हणाला.
मुंबई : अझानवरील ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पार्श्वगायक सोनू निगम पुन्हा एकदा काँट्रोव्हर्सीत अडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचं राष्ट्रगीत लागलं, तर त्याच्या सन्मानार्थ उभा राहीन, असं वक्तव्य सोनूने केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावलं जाऊ नये, असं मतही सोनू निगमने व्यक्त केलं.
'जर पाकिस्तानचं राष्ट्रगीत लावलं आणि सर्व पाकिस्तानी नागरिक उभे राहिले, तर मीसुद्धा तो देश आणि त्या नागरिकांच्या सन्मानार्थ उभा राहीन. काही जणांना वाटतं चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावलं जावं, तर काही जण त्याला विरोध करतात. राष्ट्रगीत हा सन्मानाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. मला वाटतं सिनेमागृह, रेस्टॉरंट यासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत लावू नये.' असं सोनू म्हणाला.
'मी माझ्या पालकांचा आदर राखतो. पण जर मला माहित असेल, की एखाद्या ठिकाणी त्यांचा अनादर होणार आहे, तर मी त्यांना तिथे का घेऊन जावं? ते जेव्हा कधी बाहेर जातील, त्यांचा सन्मान व्हावा, असंच मला वाटतं. हीच गोष्ट राष्ट्रगीताबाबत आहे. जिथे राष्ट्रगीताचा अनादर होण्याची शक्यता आहे, तिथे ते वाजवलं जाऊ नये' असंही सोनू निगमला वाटतं.
'जर राष्ट्रगीत लावलं गेलं, तर आपण उभं राहिलंच पाहिजे. मग त्यात इगो नको. जर मी चांगला आणि समंजस नागरिक असेन, तर मी कुठल्याही देशाच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभा राहीन' असं मत सोनूने व्यक्त केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement