एक्स्प्लोर

एन्ट्री हाच विजय असेल, रजनीकांत राजकारणात!

राजकारण हे क्षेत्र रजनीकांत यांच्यासाठी नवीन नाही. याआधी 1996 साली डीएमकेला समर्थन देत रजनीकांत यांनी जयललिता यांच्याविरोधात प्रचारही केला होता आणि त्यावेळी जयललिता यांच्या पक्षाचा पराभव झाला होता.

चेन्नई : दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ‘थलायवा’ रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. स्वत: रजनीकांत यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा 31 डिसेंबरला जाहीर करणार असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार यासंदर्भात थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर घोषणा करणार आहेत. आजपासून पुढचे सहा दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांची भेट घेणार आहेत. 26 ते 31 डिसेंबर  दरम्यान चेन्नईच्या राघवेंद्र कल्याणा मंडमपमध्ये चाहत्यांना भेटणार आहेत. रजनीकांत नेमकं काय म्हणाले? “मला राजकारण नवीन नाही. फक्त उशीर झाला आहे. मात्र माझा राजकीय प्रवेश हा एकप्रकारे विजयासारखाच असेल. मी 31 डिसेंबरला यासंदर्भातील निर्णय जाहीर करेन.”, असे रजनीकांत यांनी सांगितले. त्यामुळे राजकारणात रजनीकांत यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो आहे. तसे, राजकारण हे क्षेत्र रजनीकांत यांच्यासाठी नवीन नाही. याआधी 1996 साली डीएमकेला समर्थन देत रजनीकांत यांनी जयललिता यांच्याविरोधात प्रचारही केला होता आणि त्यावेळी जयललिता यांच्या पक्षाचा पराभव झाला होता. काही दिवसांपूर्वी चाहत्यांशी संवाद साधताना, रजनीकांत म्हणाले होते की, “जर मी राजकारणात प्रवेशाचा निर्णय घेतला, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन.” दरम्यान, दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांनी राजकारणात प्रवेश करणे, यात काही विशेष वाटण्याजोगे नाही. कारण याआधीही अनेकांनी राजकारणात प्रवेश करुन अगदी मुख्यमंत्रिपदासोबत केंद्रीय मंत्रिपदापर्यंतही झेप घेतली आहे. एमजी रामचंद्रन असो वा चिरंजीवी, असे अनेकजण राजकारणाचा उंबरठा ओलांडत अगदी मंत्रिपदापर्यंत पोहोचले. राजकारणात यश मिळवले. शिवाय, आता अभिनेते कमल हसन सुद्धा राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच दक्षिण भारतातील राजकारणात येत्या काळात नव्या घडामोडी पाहायला मिळतील, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget