ऋतिक रोशनने 21 नोव्हेंबरचा दिवस केला मार्क; शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट, फरहान अख्तरचं केलं दिलखुलास कौतुक
त्याने फरहान आणि रितेश यांनी वर्षानुवर्षं स्वतःच्या मर्यादा ओलांडत केलेल्या कामाची जबरदस्त स्तुती केली आहे.

Hrithik Roshan: बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनने एक्सेल एंटरटेनमेंटची आगामी वॉर ड्रामा फिल्म ‘120 बहादुर’ पाहून मनापासून कौतुक केलं आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर ऋतिकने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहली असून त्यात त्याने आपल्या जुन्या मित्रांबरोबर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबतच्या आठवणीही सांगितल्या आहेत. ऋतिक म्हणतो, “21 नोव्हेंबर हा दिवस मी माझ्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवला आहे.” त्याने फरहान आणि रितेश यांनी वर्षानुवर्षं स्वतःच्या मर्यादा ओलांडत केलेल्या कामाची जबरदस्त स्तुती केली आहे.
ऋतिकची भावूक पोस्ट
पोस्टमध्ये ऋतिक लिहतो,“ फरहान आणि रितेश… माझ्या मित्रांनो, तुम्ही दोघंही अनेक वर्षांपासून कसं सतत स्वतःच्या मर्यादा ओलांडत आहात आणि नवनव्या शिखरांवर पोहोचत आहात, हे मी पाहिलंय. ‘लक्ष्य’मध्ये तुम्ही घातलेली मेहनत, जोश आजही आठवतो… पण ‘120 बहादुर’मध्ये दिसणारा जिद्द आणि आवेश तर त्याहीपेक्षा मोठं आणि अधिक भव्य काहीतरी देण्याचं वचन देतो.या अप्रतिम कलाकार आणि दिग्दर्शक रजनीश, एक्सेल टीमला भरपूर प्रेम… आणि माझ्या बहादुर मित्राला, फरहानला एक मोठी मिठी. 21 नोव्हेंबरचा दिवस मी माझ्या कॅलेंडरमध्ये मार्क केला आहे.”
ऋतिकच्या पोस्टवर फरहाननेही त्याच्या खास अंदाजात त्याला रिप्लाय केलंय, तो म्हणाला ,"ऋतिक… खूप खूप धन्यवाद. तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत . तू हा चित्रपट कधी पाहशील याची मी आतुरतेने वाट पाहतोय… मोठी मोठी मिठी, मित्रा."
सोशल मीडियावर ट्रेलरला चांगला प्रतिसाद
फिल्मचा ट्रेलर आणि टीझर मिळून 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. फॅन्स ही फिल्म वर्षातील सर्वात इमोशनल आणि पावरफुल वॉर ड्रामा ठरणार असल्याचं म्हणत आहेत.
View this post on Instagram
कुमाऊं रेजिमेंटच्या वीर जवानांची खरी कहाणी
‘120 बहादुर’ ही 1962 च्या युद्धातील 13 कुमाऊं रेजिमेंटच्या 120 सैनिकांची खरी कथा सांगणारी फिल्म आहे. रेजांग ला येथील लढाईत या सैनिकांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचं रक्षण केलं.फरहान अख्तर या चित्रपटात मेजर शैतान सिंह भाटी (पीवीसी) यांची भूमिका साकारत आहे.ज्यांनी इतिहासात अमर अध्याय लिहिला.
“हम पीछे नहीं हटेंगे” चित्रपटाची दमदार ओळ
फिल्ममधील ही ओळ देशभक्तीची उर्मी आणि न डगमगणारी हिम्मत दाखवते.चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश ‘रेझी’ घई यांनी केले असून निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अमित चंद्रा यांनी केली आहे.‘120 बहादुर’ 21 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे.






















