एक्स्प्लोर
टायगरच्या 'मुन्ना मायकल'ची निराशा, चार दिवसात किती कमाई?
अभिनेता टायगर श्रॉफची आणि नवाजुद्दिन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला 'मुन्ना मायकल' सिनेमाबद्दल अनेकांना उत्सुकता होती. बऱ्यापैकी रसिकांनी सिनेमा पाहिलाही. मात्र, अपेक्षित प्रतिसाद सिनेमाला पाहायला मिळाला नाही.

नवी दिल्ली : अभिनेता टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दिन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला 'मुन्ना मायकल' सिनेमाबद्दल अनेकांना उत्सुकता होती. बऱ्यापैकी रसिकांनी सिनेमा पाहिलाही. मात्र, अपेक्षित प्रतिसाद सिनेमाला मिळताना दिसत नाही. 'मुन्ना मायकल' सिनेमाने भारतात प्रदर्शनानंतर चार दिवसात केवळ 24 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवरुन याबाबत माहिती दिली. 'मुन्ना मायकल'ची भारतातील कमाई -
- पहिला दिवस - 6.65 कोटी
- दुसरा दिवस - 6.32 कोटी
- तिसरा दिवस - 8.70 कोटी
- चौथा दिवस - 3.25 कोटी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























