Housefull 5: अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ बाबत मोठी अपडेट, यावेळी 'या' बड्या अभिनेत्रींचा समावेश
Housefull 5: या फ्रेंचायजीच्या आधीच्या चित्रपटांमध्ये नेहमीच मोठ्या स्टार्सचा ताफा दिसत आला आहे, आणि यावेळी त्यावर आणखी एक पाऊल पुढे टाकलं जात असल्याचं दिसतंय.
Housefull 5: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, ‘हाउसफुल 5’ या आगामी सिनेमाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी हाऊसफुलच्या फ्रेंचायझीत फक्त कॉमेडीच नाही तर बड्या अभिनेत्रींचाही तडका पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा प्रेक्षकांसाठी खास असणार आहे कारण ‘हाउसफुल’ फ्रेंचायझीचा हा पाचवा भाग आहे.या सिनेमाचे निर्माते या सिनेमाला भव्य स्वरूप देण्यासाठी काहीही कमी ठेवत नसल्याचं सांगण्यात येतंय. सिनेमाचं चित्रीकरण भव्य लोकेशन्सवर केलं जाणार आहे. त्यामुळं हाऊसफुलचा पाचवा भाग प्रेक्षकांसाठी हा एक भन्नाट अनुभव ठरेल. दरम्यान, या चित्रपटात पाचव्या भागात बॉलिवूडच्या लोकप्रीय अभिनेत्री या सिनेमात दिसणार आहेत. कोण कोण असणार हाऊसफूल ५मध्ये?
अक्षय कुमारसोबत दिसणार या बड्या बॉलिवूड क्विनस
'हाऊसफुल 5' च्या कास्टची घोषणा झाली असून, या वेळी सिनेमात
Cruising through the last schedule of our cinematic journey! ⛵️5️⃣🌊#SajidNadiadwala’s #Housefull5
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) November 27, 2024
Directed by @Tarunmansukhani@akshaykumar @Riteishd @juniorbachchan @FardeenFKhan @Asli_Jacqueline #SonamBajwa @NargisFakhri @duttsanjay @bindasbhidu @nanagpatekar @IChitrangda… pic.twitter.com/Et0dk82GIi
नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना हसवणार
याआधीच्या हाऊसफूलच्या चारही भागांना प्रेक्षकांना भरपूर हसवलं होतं, आता ‘हाऊसफुल 5’ कडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. कलाकारांचा कल्ला, हास्याची मेजवानी, आणि धमाकेदार कॅरेक्टर्स हा या सिनेमाच्या यशाचा फॉर्म्यूला आहे. यावेळीही हाऊसफुलची कथाही अधिक मनोरंजक आणि नवीन ट्विस्टनं भरलेली असेल,असं सांगितलं जात आहे.
कधी होणार Housefull 5 प्रदर्शित?
अक्षय कुमारची मल्टीस्टारर फिल्म ‘हाउसफुल 5’ 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या पत्नी वर्दा खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की, या सिनेमाचं अंतिम शूटिंग शेड्यूल सुरू झालं आहे. या पोस्टसोबतच सिनेमाच्या स्टारकास्टचा ग्रुप फोटोदेखील समोर आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.