(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Himanshi Khurana Birthday: जीमला न जाता घटवलं 11 किलो वजन, या अभिनेत्रीनं तूप पराठे खात केला देसी स्टाईल वेटलॉस
Himanshi Khurana Birthday: रोजच्या आहारात शेकडो लोकांप्रमाणे मी तुप, तेल, पराठे खात असल्याचं हिमांशी सांगते.
Himanshi Khurana Birthday: आजकाल वजन कमी करण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. कधी जीमला हजारो रुपये भरून तर अतिरेकी डाएट करत अनेकजण आजारपण ओढावून घेतात. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीनं देसी स्टाईल तुप पराठे खात दररोजच्या घरच्या आहारातून आणि विशेष म्हणजे जीमला न जाता तब्बल ११ किलो वजन कमी केलंय.बिगबॉस १३ मध्ये झळकलेल्या बॉलिवूडच्या हिमांशी खुराणा या पंजाबी अभिनेत्रीनं देशी पद्धतीनं घरचं खात वजन कमी केलंय. पण तिनं हे कसं केलं?
हिमांशी खुराणानं वेटलॉससाठी काय घेतला आहार?
हिमांशीनं कोणत्याही जीममध्ये न जाता आणि डाएटचं कोणतंही फॅड न फॉलो करता वजन कमी केलंय. ती सांगते, घरात शिजवलेल्या ताज्या जेवण्याचं रुटीन पाळलं तरी वजन कमी करता येऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी आवडत्या पदार्थांना कधीच सोडण्याची गरज नसल्याचं ती सांगते. हिमांशी तिच्या आहारात रोज पराठे खात असल्याचं ती सांगते. रोजच्या आहारात शेकडो लोकांप्रमाणे मी तुप, तेल, पराठे खात असल्याचं हिमांशी सांगते. आठवड्यातून फक्त दोन वेळा ती पायलट्स करते, असं ती सांगते.हाच तिचा निरोगी राहण्याचा मंत्र असल्याचं ती सांगते.
तणाव चिंता PCOC वरही हिमांशी सांगते..
तणाव, चिंता, PCOS एंडोमेट्रेओसिस ही वजन व्यवस्थापनावर परिणाम करणारे फॅक्टर असल्याचं हिमांशी सांगते. आजच्या जीवनशैलीत तणाव ही समस्या जगण्याचा अपरिहार्य भाग बनला आहे. यामुळं वजन झपाट्यानं वाढू शकतं. पण त्यासाठी ताजा घरचा आहार गरजेचा असल्याचं ती सांगते.
वजन कमी करण्यासाठी जीमची गरज नाही?
निरोगी जीवनशैली ही केवळ वजन कमी करण्याबाबत नाही.निरोगी असण्याबद्दल आहे असं हिमांशी सांगते. क्षणभंगूर ट्रेंडपेक्षा सर्वांगीण हेल्थला प्राधान्य देणं हे आहे.
बिगबॉसनंतर डेटींग,लग्न अन् घटस्फोट
हिमांशी आणि असीम यांनी 'बिग बॉस 13' या रिॲलिटी शोनंतर डेटिंगला सुरुवात केली. हिमांशीने, सुमारे चार वर्षांच्या डेटिंगनंतर, 2023 मध्ये असीमपासून वेगळे होण्याची घोषणा तिनं करत इंस्टाग्रामवरून चाहत्यांना सांगितलं. धार्मिक विश्वासांमधील मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )