एक्स्प्लोर

Hawahawai Trailer : सामान्य गृहिणीचा संघर्ष; हवाहवाई चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Hawahawai Trailer : हवाहवाई या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Hawahawai Trailer : मागील काही दिवसांपासून हटके टायटल असलेल्या 'हवाहवाई' (Hawahawai) या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा सजयनचं मराठीत पदार्पण होत असून आज या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत  वन रूम किचन, गाव तसं चांगलं सारखे अनेक उत्तमोत्तम  चित्रपट केले असल्याने "हवाहवाई" त्याच मांदियाळीतला आहे. 

'हवाहवाई'च्या ट्रेलर मधून हा चित्रपट एका मध्यमवर्गीय गृहिणीची संघर्षमय कथा असल्याचे दिसते.. आयुष्यात  चैनीत राहता आलं नाही तरी चालेल  सुखाने जगता आलं पाहिजे ही भावना चित्रपटाची नायिका ज्योती हीची आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटामुळे ज्योती  घरसंसार सांभाळून फूडस्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेते असे ट्रेलर मध्ये दिसते. सामान्य गृहिणी असलेल्या ज्योतीच्या ध्येयपूर्तीचा प्रवास नेमका कोणत्या वळणावर जातो हे बघणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्यपूर्ण  ठरणार आहे. 

'हवाहवाई'  चित्रपटात अभिनेत्री निमिषा सजयन सोबतच अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे,विजय आंदळकर, अंकित मोहन या कलाकारांनी महत्वपूर्ण  भूमिका हवाहवाई चित्रपटात साकारल्या आहेत. 

'हवाहवाई' चित्रपटाचे वैशिष्ट्ये  म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88 व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे. एका मध्यमवर्गीय गृहिणीचा स्वप्नपूर्तीकडे होणार संघर्षमय प्रवास दाखवणारा  'हवाहवाई' येत्या 7 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर:

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Hawahawai : ‘हवाहवाई’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget