Happy Birthday Vicky Kaushal : इंजिनिअरची नोकरी नाकारून मनोरंजन विश्वात आला, ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून प्रेक्षकांच्या मनात वसला! जाणून घ्या विकी कौशलबद्द्ल..
Vicky Kaushal Birthday : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आज (16 मे) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.
Vicky Kaushal Birthday : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicku Kaushal) आज (16 मे) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. पंजाबी कुटुंबातील, विकीचे वडील शाम कौशल हे प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक आहेत. आजघडीला विकी कौशल हिंदी चित्रपटांचे मोठे नाव बनले आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा, त्याच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी. तो मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिकत होता.
या अभ्यासक्रमादरम्यान तो एकदा एका आयटी कंपनीत इंडस्ट्रीयल व्हिजीटसाठी गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर विकीला समजले की, तो या ऑफिसच्या कामासाठी बनलेलाच नाही. इंजिनिअर म्हणून नोकरी नाकारल्यानंतर, त्याने चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. यानंतर अभिनय शिकण्यासाठी विकी कौशलने ‘किशोर नमित कपूर अकादमी’मध्ये प्रवेश घेतला.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात एन्ट्री!
बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यापूर्वी विकी कौशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. विकी दिग्दर्शक अनुराग कश्यपला आपला गुरू मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांने थिएटर करायला सुरुवात केली. विकी कौशल अनुराग कश्यपच्या 'लव शव ते चिकन खुराना' आणि 'बॉम्बे वेल्वेट' या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.
मुख्य अभिनेता म्हणून ‘मसान’ची चर्चा!
विकी कौशलचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता 'मसान'. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले होते. मसानला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर त्याने 'लव्ह पर स्क्वेअर फूट', 'राझी', 'संजू' आणि 'मनमर्जियां' असे हिट चित्रपट केले. 2019 मध्ये आलेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट 2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यावर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले होते. या चित्रपटासाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती.
हेही वाचा :
- Irsal : बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज!
- Dharmaveer : 'धर्मवीर'ची भुरळ मुख्यमंत्र्यांनाही; सिनेमा पाहायला उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरे थेट सिनेमागृहात
- Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई