Happy Birthday Arjun Bijlani : रिजेक्शनचा सामना करत शोधली वाट; आज आहे टीआरपी किंग
Arjun Bijlani : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Arjun Bijlani Birthday : 'नागिन'च्या (Naagin) माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अर्जुन बिजलानीची (Arjun Bijlani) गणना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत होते. अर्जुन आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अर्जुन बिजलानीला अभिनयाची प्रचंड आवड आहे. वयाच्या 19 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी अर्जुनकडे आली. त्यामुळे आवड जोपासत त्याने पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या. पण त्याला रिजेक्शचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचा स्वत: वरचा विश्वास उडाला. हळूहळू त्याला चांगलं काम मिळायला लागलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.
टीआरपी किंग अर्जुन बिजलानी
अर्जुन बिजलानीने नागिन (Naagin)', 'परदेस में है मेरा दिल (Pardes Mein Hai Mera Dil)', 'लेफ्ट राइट लेफ्ट (Left Right Left)' और 'मिले जब हम तुम (Miley Jab Hum Tum)' सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
अर्जुन बिजलानी कोट्यवधींचा मालक
अर्जुन बिजलानी हा छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका एपिसोडसाठी तो 80 हजार ते 1.5 लाख रुपये घेतो. तर जाहिरातीसाठी 30 ते 40 लाख रुपये आकारतो. पाच कोटींहून अधिक त्याचे वार्षिक उत्पन्न आहे. त्याची एकूण संपत्ती 29 कोटींच्या आसपास आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांसह 10 कोटींचे आलिशान घर आहे.
अर्जुनला अभिनय क्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागली आहे. पण हताश न होता त्याने प्रयत्न सुरु ठेवले. त्यानंतर 2014 साली त्याली 'कार्तिका' ही मालिका मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून त्याचा मनोरंजनसृष्टीतला प्रवास सुरू झाला. अर्जुनला चार वर्षांच्या संघर्षानंतर म्हणजेच 2008 साली ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ या मालिकेच्या माध्यमातून खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला.
अर्जुन बिजलानी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
संबंधित बातम्या