Happy Birthday Tabu : करियर हिट पण लव्ह लाईफ फ्लॉप; राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या तब्बूविषयी जाणून घ्या...
Tabu : आपल्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली तब्बू आज 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.
![Happy Birthday Tabu : करियर हिट पण लव्ह लाईफ फ्लॉप; राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या तब्बूविषयी जाणून घ्या... Happy Birthday Tabu Career hit but love life flop Know about National Award winning Tabu Happy Birthday Tabu : करियर हिट पण लव्ह लाईफ फ्लॉप; राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या तब्बूविषयी जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/04/448bb953aa4820af388ba8d1028b85ee1667528901853254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Happy Birthday Tabu : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करण्यासोबत तब्बूने (Tabu) बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तब्बू 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बूने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. अभिनयासोबत प्रेमप्रकरणामुळे तब्बू कायम चर्चेत राहिली आहे.
दक्षिणात्य सुपरस्टारसोबत जोडलं नाव!
तब्बूचं नाव दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसोबत जोडलं गेलं होतं. रिपोर्ट्सनुसार, तब्बू आणि नागार्जुन एकमेकांना डेट करत होते. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतरही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. नागार्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बू अभिनेता संजय कपूरला डेट करायला लागली. पण त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तिचं नाव लोकप्रिय दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत जोडलं गेलं. पण त्यांचं नातंदेखील फार काळ टिकू शकलं नाही.
तब्बू लवकरच अजय देवगणसोबत 'दृश्यम 2' या सिनेमात दिसणार आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. याआधी ती 'भूल-भुलैया 2' या सिनेमात झळकली होती. तब्बूने 'दे-दे प्यार दे', 'गोलमाल', 'अंधाधुन', 'दृश्यम', 'जय हो', 'चीनी कम' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
View this post on Instagram
कोट्यवधींची मालकीन तब्बू!
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री तब्बू आजही अॅक्टिव्ह आहे. अद्याप तब्बूने लग्न केलेले नाही. वयाच्या 15 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी तब्बू आज कोट्यवधींची मालकीन आहे. एका सिनेमासाठी ती 2 ते 4 कोटी मानधन घेते. तिची महिन्याची कमाई 25 लाखाच्या आसपास आहे. तर एकूण संपत्ती 22 कोटींच्या आसपास आहे.
आलिशान घर असण्यासोबत तब्बूकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. तब्बूला गाड्यांची प्रचंड आवड आहे. ऑडी Q7, मर्सडीज आणि जैगुआर X7 अशा अनेक लग्झरी गाड्या तिच्याकडे आहेत. मुंबई, हैदराबादसह गोव्यातदेखील तब्बूचा आलिशान बंगला आहे.
तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादी मुस्लिम कुटुंबात झाला. तिचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे. बालकलाकार म्हणून तिने सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. 1980 साली आलेल्या ‘बाजार’ सिनेमाच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने 1985 मध्ये आलेल्या ‘हम नौजवान’ या सिनेमात अभिनेता देव आनंदसोबत काम केलं.
संबंधित बातम्या
Milind Soman Birthday : न्यूड फोटोशूट ते 25 वर्ष लहान गर्ल फ्रेंडशी लग्न; फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणचा आज 57वा वाढदिवस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)