Riteish Deshmukh: रितेशच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाची खास पोस्ट, म्हणाली, "रितेश देशमुख कोण आहे? असं जर मला कोणी विचारलं तर मी ..."
Riteish Deshmukh:अभिनेत्री जिनिलिया देशमुखनं (Genelia Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) आज (17 डिसेंबर) वाढदिवस आहे. रितेशच्या वाढगदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमधून त्यांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखनं (Genelia Deshmukh) देखील एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलियाची पोस्ट
जिनिलियानं रितेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश आणि जिनिलियाच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. या फोटोला जिनिलियानं कॅप्शन दिलं, "जर कोणी मला विचारावे की, "रितेश देशमुख कोण आहे? तर मी एवढेच म्हणेन की, "संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य आणि तो सर्वांत महान मनुष्य माझा आहे. हॅप्पी हर्थ-डे नवरा" जिनिलियानं शेअर केलेल्या या फोटोवर रितेशनं देखील खास कमेंट केली आहे.
जिनिलियानं शेअर केलेल्या फोटोला रितेशनं कमेंट केली, "मी तुझ्यावर प्रेम करतो बायको - तू माझ्यासाठी काय आहेस, हे तुला माहित नाही. तू माझा दिवस खास बनवतोस. तू माझे आयुष्य खास बनवतोस" रितेशच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
रितेश आणि जिनिलियाची लव्ह स्टोरी
2002 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात रितेश आणि जिनिलियानं काम केलं आहे. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोडी ते लग्नबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलिया यांना 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान हा मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्या दुसरा मुलगा राहिलचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला.
रितेश जिनिलियाच्या 'वेड'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
गेल्या वर्षी रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट रिलीज झाला. वेड या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खाननं कॅमिओ रोल केला आहे.वेड या चित्रपटातील या चित्रपटातील सुख कळले, वेड लावलंय या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या: