Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा 'रजनीकांत' कसा झाला? खलनायक ते नायक; जाणून घ्या 'थलायवा'चा फिल्मी प्रवास...
Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या 'थलायवा' रजनीकांत यांचा आज जन्मदिन आहे.
Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 'थलायवा' (Thalaiva) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत कसा झाला?
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केले. त्यावेळी त्यांना महिन्याला 750 रुपये मिळायचे. बसमध्ये अनोख्या पद्धतीत तिकीट देण्याच्या आणि शिट्ट्या वाजवण्याच्या त्यांच्या शैलीकडे एका दिग्दर्शकांची नजर पडली. त्यावेळी त्यांनी आपल्या सिनेमात काम करण्यासाठी रजनीकांत यांना ऑफर दिली.
रजनीकांत यांचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. या प्रवास अनेक चढ-उतार आले. रजनीकांत यांनी अभिनयक्षेत्रात जितकं नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने लोकांची मदत करून कमावलं आहे. 1974 साली रजनीकांत यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'अपूर्व रागंगल' हा त्यांचा पहिला सिनेमा.
खलनायक ते नायक
रजनीकांत यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खूपच फिल्मी आहे. नायक होण्याआधी ते खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण एस. पी. मुथुरामन यांच्या 'चिलकम्मा चप्पींडी' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली. 'ओरू केल्विकुरी' हा त्यांचा नायक म्हणून असलेला पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. बाशा, मुथू, अन्नामलाई, अरुणाचलम, थलायवी हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.
रजनीकांत यांची फिल्मी लव्हस्टोरी...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. रजनीकांत यांनी त्यांच्याहून आठ वर्षांनी लहान असणाऱ्या लता रंगाचारीसोबत लग्न केलं आहे. लता यांनी कॉलेजमध्ये असताना एका मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर रजनीकांत आणि लता यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 1981 साली ते लग्नबंधनात अडकले. रजनीकांत आणि लता यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.
रजनीकांत यांनी राजकारणातदेखील प्रवेश केला आहे. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. गिनिज बुकमध्येदेखील त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यांचे सिनेमे रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई करतात. आजही त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात. रजनीकांत यांनी आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांना देव मानलं जातं.
संबंधित बातम्या